कार्तिक आर्यनचा पहिला किसिंग सीन पाहू अशी झाली होती त्याच्या आईची अवस्था, तर आजीने दिली होती अशी प्रतिक्रिया…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड स्टार कार्तिक आर्यनच्या लोकप्रियतेमध्ये त्याच्या रोमँटिक अवताराचा मोठा हात आहे. कार्तिकचा शेवटचा चित्रपट भूल भुलैया २ मध्ये देखील कियारा अडवाणीसोबत त्याचा रोमँटिक अँगल होता आणि दोघांनी चित्रपटात किसिंग सीन केला होता. कार्तिकच्या किसिंग सिन्स आणि रोमँटिक मुमेंट्सला दर्शक खूपच पसंद करतात.

पण स्वतः कार्तिकसाठी ऑनस्क्रीन किसिंग सीन करणे खूपच कठीण काम होते. तथापि त्याचा डेब्यू चित्रपट प्यार का पंचनामा मध्ये देखील त्याने नुसरत भरुचासोबत किसिंग सीन दिला होता. पण या सीनवर त्याच्या घरामधून काही अशी प्रतिक्रिया आली होती कि कार्तिक देखील पुन्हा स्क्रीनवर किसिंग सीन करण्यास मागेपुढे पाहू लागला.

आपल्या आकाशवाणी या दुसऱ्या चित्रपटाच्या वेळी एका मुलाखतीदरम्यान कार्तिकने सांगितले होते कि त्याच्या आईला ऑनस्क्रीन किस करण्यावर समस्या होती आणि यामुळे तो चित्रपटांमध्ये असे सीन करण्यापासून लांब राहतो. स्वतः कार्तिक देखील किसिंग सीनसाठी कम्फर्टेबल नव्हता. २०१३ मध्ये एका मुलाखतीमध्ये कार्तिकने म्हंटले होते कि मी मुलग आहे मला माहिती आहे कि कसे कीस करायचे आहे.

कार्तिकने पुढे म्हंटले कि माझी मम्मी रडली होती जेव्हा तिने मला ऑनस्क्रीन किस करताना पाहिले होते. ती या गोष्टीवर नाखूष होती कि एक तर शिक्षण सोडून अभिनेता बनला आहे आणि वरून तोंड काळे करत आहे. मला देखील इच्छा नव्हती कि उद्या मी स्वतः ऑनस्क्रीन कीस करावे. पण लव सरची डिमांड होती कि प्यार का पंचनामामध्ये कीस करायचे आहे आणि मी केले.

२०१३ मध्ये रिलीज झालेला आकाशवाणी तर हिट झाला नाही पण कार्तिक आर्यनला लोकांनी पसंद करायला सुरुवात केली होती. या चित्रपटाला प्रमोट करत एका मुलाखतीमध्ये कार्तिकने म्हंटले होते कि अभिनय करता करता स्टार बनला तर ठीक. २०२२ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या भूल भुलैया २ चा अभिनेता कार्तिक आर्यन हा बॉलिवूडचा तरुण स्टार आहे आणि इंडस्ट्रीला त्याच्याकडून खूप आशा आहेत.

फेब्रुवारी २०२३ मध्ये कार्तिकचा शहजादा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत कृती सेनन देखील आहे. यानंतर तो पुन्हा एकदा कियारा अडवाणीसोबत सत्य प्रेम की कथा चित्रपटामध्ये दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

Leave a Comment