चट मंगनी पट ब्याह तर तुम्ही ऐकले असे पण झटपट मुले हा आजकाल नवीन ट्रेंड बनला आहे. अनेक फिल्मी कलाकार असे आहेत ज्यांनी लग्नाच्या नंतर लगेच बेबी प्लॅनिंग केले आणि खूपच लवकर आई-बाबा बनले. अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी लग्नाच्या अगोदरच बेबी प्लॅनिंग केली होती.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर: बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न केले होते. तर ६ नोव्हेंबर २०२२ रोजो हे स्टार कपल आई-बाबा बनले. रणबीर कपूर-आलिया भट्ट लग्नाच्या ७ महिन्यात पॅरेंट्स बनले.
शाहिद कपूर आणि राजपूत कपूर: कबीर सिंह स्टार शाहिद कपूर आणि मीरा राजपूर कपूरने देखील लग्नाच्या वर्षभरामध्ये मुलगी मिशा कपूरला जन्म दिला होता. दोघांनी लग्नानंतर लगेचच बेबी प्लॅनिंग सुरु केली होती.
दिया मिर्जा आणि वैभव रेखी: अभिनेत्री दिया मिर्जा आणि वैभव रेखीने १५ फेब्रुवारी २०२१ रोजी लग्न केले होते. लग्नाच्या अवघ्या ३ महिन्यामध्येच अभिनेत्रीने पहिला मुलगा अव्यान आजाद रेखीला जन्म दिला होता. हि एक प्रीमॅच्योर डिलिव्हरी होती. बेबी अव्यानला ज्यानंतर अनेक दिवस नर्सरीमध्ये ठेवले होते. अभिनेत्रीने सी-सेक्शनद्वारे पहिल्या मुलाला जन्म दिला होता.
नेहा धूपिया आणि अंगद बेदी: फिल्म स्टार नेहा धुपिया आणि अंगद बेदीने लग्नाच्या वर्षभरामध्येच मुलगी मेहरला जन्म दिला होता. फिल्म स्टार कपलने १० मे २०१८ रोजी लग्न केले होते तर मुलगी नोव्हेंबर २०१८ मध्ये जन्मली होती. नेहा धूपिया लग्नाच्या अगोदरच प्रेग्नंट राहिली होती.
नताशा स्तानकोविक आणि हार्दिक पांड्या: अभिनेत्री नताशा स्तानकोविक आणि क्रिकेटर हार्दिक पांडयाने जानेवारी २०२० मध्ये एंगेजमेंटची घोषणा केली होती आणि लग्नाच्या काही महिन्यांमध्येच हे स्टार कपल जुलै २०२० मध्ये मुलगा अगस्तचे पॅरेंट्स बनले होते.
आलिया-रणबीरप्रमाणे लग्नानंतर वर्षभरातच ‘हे’ स्टार्स झाले आई-बाबा , लग्नाच्या अगोदर करून बसले होते…
By Viraltm Team
Published on:
