बिपाशा बसूने शेयर केली तिच्या मुलीची पहिली झलक, पहा दिसते अगदी तिच्यासारखीच हुबेहूब…

By Viraltm Team

Published on:

बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर आई-वडील झाल्यानंतर खूप एंजॉय करत आहेत. आता आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनंतर बिपाशा बसूने देखील आपल्या मुलीची पहिली झलक शेयर केली आहे. बिपाशाने शेयर केलेली हि पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. बिपाशाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून बेबी आणि पती करण सिंह ग्रोव्हरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

बिपाशाने जो फोटो शेयर केला आहे त्यावर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. मुलीच्या जन्मानंतर काही वेळामध्येच बिपाशा आणि करणने सोशल मिडियावर पोस्ट शेयर करून चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. आता अभिनेत्रीने चाहत्यांनी प्रतीक्षा संपवत तिची मुलगी देवीची एक झलक शेयर केली आहे. फोटोमध्ये बिपाशा आणि करण खिडकीजवळ उभे असलेले दिसत आहेत.

शेयर केलेल्या पोस्टमध्ये करण सिंह ग्रोवरने मुलीला आपल्या हातामध्ये घेतले आहे. जवळच उभी असलेली बिपाशा मुलीकडे पाहताना दिसत आहे. कपलचा हा फोटो त्या क्षणाचे महत्व सांगत आहे. त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यात मुलीच्या आगमनाचा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. हा फोटो शेअर करताना बिपाशाने तिच्या मुलीच्या स्वीटनेसचे रहस्यही उघड केले आहे. अभिनेत्री लिहिते, स्वीट बेबी एंजेल बनवण्याची रेसिपी आहे.

तुमचा क्वार्टर कप, माझा क्वार्टर कप, अर्धा कप आईचे आशीर्वाद, जादूचे थोडे टॉपिंग, इंद्रधनुष्याचे 3 थेंब, देवदूत धूळ, युनिकॉर्न स्पार्कल आणि सर्व दिव्य गोष्टी, स्वादनुसार क्यूटनेस आणि रुचकरपणा. बिपाशा बसूच्या या फोटोवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत.

चाहते या फोटोवर आपले प्रेम व्यक्त करत हार्ट इमोजी बनवत आहेत. लग्नाच्या ६ वर्षानंतर बिपाशा आणि करणच्या आयुष्यामध्ये आनंद आला आहे. बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवरने ३० एप्रिल २०१६ मध्ये लग्न केले होते. बिपाशाच्या प्रेग्नंसीच्या बातम्या २०१८ मध्ये देखील आल्या होत्या. जेव्हा एका इवेंटमध्ये तिचे बेबी बंप पाहायला मिळाले होते. बिपाशाने त्यावेळी एक ट्विट करून या वृत्तांचे खंडन केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

Leave a Comment