मुलीचे इतके क्युट नाव ठेवून बिपाशा बसूने सेलेब्ससोबत चाहत्यांचे जिंकले मन, दिसली छोट्या परीची पहिली झलक…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट नुकतेच आईवडील बनले आहेत. अभिनेत्री आलिया भट्टने ६ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या रिलायन्स हॉस्पीटलमध्ये मुलीला जन्म दिला होता. तर आता बॉलीवूडच्या आणखी एका कपलच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर देखील आईवडील झाले आहेत.

बिपाशा बसूने १२ नोव्हेंबर रोजी मुलीला जन्म दिला आहे. हि बातमी समोर येताच चाहते आणि सेलेब्स बिपाशा आणि करण सिंह ग्रोवरला शुभेच्छा देत आहेत. आई झाल्यानंतर अभिनेत्रीने आपल्या मुळीच पहिली झलक देखील दाखवली आहे आणि तिने चाहत्यांसोबत हि आनंदाची बातमी शेयर केली आहे. त्याचबरोबर कपलने मुलीच्या नावाच्या खुलासा देखील केला आहे.

आई झाल्यानंतर बिपाशा बसूने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेयर केला आहे. फोटो शेयर करत बिपाशाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे ”खुशियां” असे लिहिले आहे. त्याचबरोबर तिने एक नोट देखील शेयर केली आहे. यामध्ये करण आणि बिपाशाच्या मुलीचे पाय दिसत आहे. मुलीचे पाय करणने आपल्या हातामध्ये घेतले आहेत.

सर्वात पहिला १२.११.२२ अशी तारीख लिहिली आहे, यानंतर कपलने मुलीचे नाव लिहिले आहे. कपलच्या मुलीचे नाव देवी बसू सिंह ग्रोवर ठेवले आहे. याखाली लिहिले आहे कि, आमच्या प्रेमाने आणि आईच्या आशीर्वादाने आज आमची मुलगी आमच्यासोबत आहे आणि ती देवी आहे ही पोस्ट शेअर करत बिपाशाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “भाग्यवान”.

बिपाशा बसूच्या पोस्टवर चाहत्यांसोबत बॉलीवूड सेलेब्स देखील कमेंट करत त्यांना शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री दिया मिर्जाने लिहिले आहे कि, या जग्मध्ये तुझे स्वागत आहे आहे गोड परी. तुला भेटण्याची वाट पाहू शकत नाही. तुला खूप सारे प्रेम आणि आशीर्वाद. मलायका अरोराने लिहिले आहे कि अभिनंदन प्रिय बिपाशा आणि करण. इतके सुंदर नाव”.

सोनम कपूरने लिहिले आहे. “अभिनंदन प्रिय बिपाशा. किती छान नाव आहे.” सोफी चौधरीने लिहिले, “सर्वोत्तम सर्वोत्तम बातमी! तुमच्यासाठी खूप आनंद झाला! देव तुमच्या छोट्या देवदूताला आशीर्वाद देवो. @bipashabasu @iamksgofficial”. शमिता शेट्टीने लिहिले, “अभिनंदन”.

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने लिहिले आहे, “मम्मी पापा यांचे अभिनंदन आणि छोट्या परीला खूप प्रेम. देव सुंदर कुटुंबाला आशीर्वाद देवो.” कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंगने हार्ट इमोजीसोबत “देवी” असे लिहिले आहे. अलीम हकीम यांनी “तुम्हा दोघांचेही खूप अभिनंदन @bipashabasu @iamksgofficial…. परीचे या दुनियेमध्ये स्वागत आहे” असे लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

Leave a Comment