आलिया भट्टनंतर आता अभिनेत्री बिपाशा बसूने दिला बाळाला जन्म, ४३ व्या वर्षी बनली आई, पहा मुलगा झाला कि मुलगी…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड इंडस्ट्रीमधून आणखी एक गुड न्यूज समोर आली आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनंतर आता बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर आईवडील झाले आहेत. दोघे एका गोड मुलीचे पॅरेंट्स बनले आहेत. यासोबतच सोशल मिडियावर कपलला शुभेच्छा देण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे. चाहत्यांपासून ते मोठ-मोठ्या कलाकारांनी बिपाशा आणि करणवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

बिपाशा बसूने शनिवारी तिच्या मुलीला जन्म दिला आहे. यासोबत अभिनेत्री ४३ व्या वर्षी आई बनली आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरप्रमाणे बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवरने अजूनपर्यंत सोशल मिडियावर कोणतीही पोस्ट शेयर केलेली नाही. तथापि कपलच्या टीमकडून चाहत्यांना गुड न्यूज देण्यात आली आहे. स्टार कपलच्या टिमने सांगितले कि करण आणि बिपाशाने लग्नाच्या सहा वर्षानंतर आपल्या पहिल्या मुलीचे स्वागत केले आहे आणि दोघे आपल्या गोड परीच्या येण्याने खूप खुश आहेत.

बिपाशा बसूने ऑगस्टमध्ये आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. तिने बो ल्ड फोटोशूट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. तेव्हापासून आतापर्यंत अभिनेत्रीने अनेक ग्लॅमरस मॅटर्निटी फोटोशूट केले आहेत.

सोशल मिडियावर बिपाशाच्या मॅटर्निटी फोटोशूटला खूप पसंद देखील केले गेले. यासाठी चाहत्यांसोबत अनेक सेलेब्सनी अभिनेत्रीला अनेक कॉम्पलिमेंट्स दिले होते. तर आता प्रत्येकजण बिपाशाच्या गोड मुलीची पहिली झलक मिळवण्यासाठी आतुर आहेत.

बिपाशा-करण २०१६ मध्ये विवाहबंधनामध्ये अडकले होते. दोघांच्या लग्नाच्या फोटोंना देखील खूप पसंद केले गेले होते. वधू बनलेली बिपाशा सोशल मिडियावर खूपच चर्चेत राहिली होती. यानंतर अनेकवेळा अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीची बातमी समोर आली. शेवटी चाहत्यांना आता गुड न्यूज मिळाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

Leave a Comment