प्रत्येक चित्रपटामध्ये एक तर इंटीमेट सीन असतोच. अशा सीनची नेहमीच चर्चा होते. काही लोक अशा सिन्सचा प्रचंड विरोध करतात तर काही लोक असे सीन चवीने पाहतात. कथेच्या गरजेनुसार असे सिन्स चित्रपटामध्ये वापरले जातात. हे सिन्स शूट करताना बऱ्याचदा कलाकारांना खूपच कठीण जाते.
असे सिन्स शूट करताना अनेकवेळा कलाकार आपले भान देखील हरपून जाता असे देखील तुम्ही ऐकले असेल. नुकतेच एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री तमन्ना भाटीया आणि भूमिका पेडणेकरने अशा सिन्स बद्दल त्यांचा अनुभव शेयर केला आहे.
या वर्षातील काही सर्वोत्तम अभिनेत्रींची एक मुलाखत घेण्यात आली होती. ज्यामध्ये तमन्ना भाटीया आणि भूमिका पेडणेकर देखील सामील झाल्या होत्या. दोघींनी यादरम्यान प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे दिली. इंटीमेट सीन्स चित्रित करणं आणि त्यासाठी एक वेगळा प्रशिक्षक नेमणं हे किती गरजेचं आहे याबद्दल देखील त्यांनी चर्चा केली.
अभिनेत्री तमन्ना म्हणाली कि बरेच इंटीमेट सीन्स शूट करताना पुरुष कलाकार अस्वस्थ होतात हे मी अनेकवेळा अनुभवले आहे. शेवटी हिरो सुद्धा एक माणूसच आहे. बरेच पुरुष कलाकार लाजाळू असतात, अशामध्ये ते समोरच्या महिला कलाकाराला काय वाटेल याबद्दल ते नेहमी विचार करता. मी अशा देखील हिरोंना पाहिलं आहे जे माझ्यापेक्षा देखील खूप अस्वस्थ होते.
दरम्यान भुमिक पेडणेकर आपला अनुभव शेयर करताना म्हणाली कि मी जेव्हा लस्ट स्टोरीमध्ये काम करत होते तेव्हा मी खूपच अस्वस्थ झाले होते. तो सीन फक्त इंटीमेट सीन नव्हता तर त्यामध्ये ऑर्गसमसुद्धा दाखवायचा होता. सीनसाठी प्रशिक्षण देणारे प्रशिक्षकसुद्धा नव्हते. शुटींगदरम्यान अनेक लोक होते आणि माझ्या अंगावर जेमतेम कपडे होते. शुटींग करायच्या अगोदर मी आणि नीलने दोघांनी मिळून आमच्या मर्यादा आधीच ठरवल्या होत्या. त्यामुळे असे सीन करताना तुमच्या सहकालाकारासोबत चर्चा करणे खूप महत्वाचे असते.