‘ते मला चुकीच्या ठिकाणी स्पर्श करून माझी…’ कॉमेडियन भारती सिंहने केला शॉकिंग खुलासा…

By Viraltm Team

Published on:

कॉमेडी क्विन भारती सिंगला कोण नाही ओळखत. ती प्रसिद्ध कॉमेडी कलाकारांपैकी एक आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. भारती सिंहने आपल्या करियरची सुरुवात द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोमधून केली होती.

त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. भारतीने लल्लीच्या भूमिकेमधून दर्शकांच्या मानवर राज्य केले. चाहत्यांनी देखील तिच्या याच भूमिकेमुळे तिला अक्षरशः डोक्यावर घेतले. दरम्यान भारतीला अनेक कटू अनुभवांचा सामना देखील करावा लागला.

भारतीचे वर्तमान जरी चांगले असले तरी तिला भूतकाळामध्ये आलेला अनुभव कधीच विसरता येत नाही. मनीष पॉलच्या शोमध्ये भारतीने शॉकिंग गोष्टीचा खुलासा केला आहे. मुलाखतीदरम्यान ती म्हणाली कि, करियरच्या सुरुवातीला कॉर्डिनेटर्स तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचे.

त्यावेळी भारतीला हे समजत नव्हते कि आपल्यासोबत काय घडत आहे. कारण ते तिला तिच्या काकांसारखे वाटायचे. भारत म्हणते कि कॉर्डिनेटर्स माझ्या पृष्ठभागाला हात लावायचे. मला असे वाटायचे कि ते माझे काका आहेत ते वाईट काहीच करणार नाहीत.

भारतीच्या वडिलांनी एका व्यक्तीकडून पैसे घेतले होते. पण जेव्हा ते परतफेड करण्याची वेळ आली तेव्हा त्या व्यक्तीने भारतीच्या आईसोबत वाईट वर्तणूक केली होती. लहानपणी भारतीची परिस्थिती खूपच हलाखीची होती. पण भारतीने कष्ट घेऊन इंडस्ट्रीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

Leave a Comment