लग्नाच्या पहिल्या रात्रीचा विषय इतका नाजूक असतो कि यामध्ये लपवा-लपवी खूप जास्त असते. यावर उघडपणे चर्चा करण्यास सर्वजण लाजतात. मधुचंद्राचा विषय जरी निघाला तर नकळत आपल्या चेहऱ्यावर हसू येते. बॉलीवूड अभिनेत्री भाग्यश्रीने देखील आपल्या मधुचंद्राच्या रात्रीबद्द्ल खुलासा करून एकच खळबळ उडवून दिली आहे.

नॅशनल टेलीव्हिजनला मुलाखत देताना तिने याबद्दल खुलासा केला. सध्या भाग्यश्री आणि तिचा पती हिमालय दासानी स्टार प्लसवरील स्मार्ट जोडी शोमध्ये पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमा दरम्यान भाग्यश्रीने आपल्या आयुष्यामधील काही इंट्रेस्टिंग गोष्टी उघड केल्या. यादरम्यान भाग्यश्रीचा पती हिमालय दासानीनं आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचा एक मजेदार किस्सा देखील शेयर केला.

स्मार्ट जोडी शोचा प्रोमो नुकताच सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रोमोच्या सुरुवातीमध्येच भाग्यश्री आणि हिमालय मेहेंदी लगा के रखना या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहेत. यानंतर हिमालय आपल्या लग्नाचा एक किस्सा सांगताना पाहायला मिळत आहेत.

हिमालय पुढे म्हणतात कि, आमचं लग्न झालं, रिसेप्शनही झालं. यादरम्यान भाग्यश्री मला एका नव्या नवरीप्रमाणे लाजून खाली मान घालून वावरताना पाहायला मिळाली. मग मी देखील माझ्या लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल स्वप्ने रंगवू लागलो कि माझी नवी नवरी डोक्यावर पदर घेऊन पलंगावर माझी वाट पाहत बसली असेल.

पण अस काहीच झालं नाही. जेव्हा मी खोलीत गेलो तेव्हा तिने पलंगावर साडी आणि दागिने काढून टाकले होते आणि भाग्यश्री नाईट ड्रेस घालून बसली होती आणि मला म्हणाली हॅलो डार्लिंग, हॅलो बेब्स. यानंतर भाग्यश्री म्हणाली कि मी नाईट ड्रेस यासाठी घातला आहे कि आता गप्प झोपायचं, आता काहीच होणार नाही.

याआधी देखील स्मार्ट जोडी शोदरम्यान भाग्यश्री आपल्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला होता. तिने सांगितले होते कि वडिलांच्या परवानगी शिवाय लग्न केल म्हणून तिचे कुटुंबीय लग्नाला उपस्थित नव्हते आणि मिडीयान चुकीच्या बातम्या दिल्यामुळे तिने राग देखील व्यक्त केला होता.