डिस्को डांसर फेम निर्माण दिग्दर्शक बी सुभाष सध्या खूपच वाईट परिस्थतीमधून जात आहेत. गेल्या सोमवारी सुभाष यांची पत्नी तिलोत्तिम्माचे निधन झाले आहे. दिग्दर्शकची पत्नी गेल्या ६ वर्षांपासून गंभीर आजाराचा सामना करत होती. उपचार करून देखील आराम मिळत नसल्यामुळे त्यांचे २ ऑगस्ट रोजी निधन झाले. ज्यामुळे सुभाष यांच्या घरामध्ये शोककळा पसरली.
नुकतेच त्यांनी दिवंगत पत्नीच्या प्रकृतीबद्दल बोलताना म्हणाले होते कि तिलोत्तिम्माची किडनी खूपच खराब झाली आहे. कारण तिला हाई ब्लड प्रेशरची समस्या झाली होती आणि नंतर तिच्या शरीरामधील पाण्याचे प्रमाण खूपच कमी झाले होते. हे क्रिएटिनिनच्या लेवलमध्ये वाढ होण्याचे कारण बनले.
सुभाष यांची पत्नी गेल्या ६ वर्षांपासून मुंबईमध्ये आपले उपचार करून घेत होती. किडनीच्या गंभीर आजारामुळे सुभाष यांनी आपल्या पत्नीला किडनी देण्याचा विचार केला होता. नंतर आणखी एका टेस्टमध्ये समजले कि त्यांना फुफ्फुसादेखील आजार आहे. फुफ्फुसावर आणखी परिणाम होऊ नये म्हणून डॉक्टर्सनी किडनी ट्रांसप्लांट करण्यास मनाई केली. हळू हळू त्यांची प्रकृती बिघडत गेली.
माहितीनुसार सुभाष बऱ्याच दिवसांपासून आर्थिक परिस्थितीचा देखील सामना करत होते. कोरोना काळामध्ये त्यांची परिस्थिती आणखीनच बिघडली होती. पत्नीच्या उपचारासाठी त्यांनी अनेकांकडे मदत मागितली. त्यावेळी सलमान खान आणि मिथुन चक्रवर्तीने देखील त्यांची मदत केली होती.
बब्बर सुभाष यांनी १९७८ मध्ये खून चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यांनी तकदीर का बादशाह, कसम पैदा करने वाले की सारखे चित्रपटांचे दिग्दर्शन केले. पण सर्वात जास्त त्यांना डिस्को डांसर चित्रपटासाठी ओळखले जाते. डिस्को डांसर चित्रपटामध्ये मिथुन चक्रवर्ती प्रमुख भूमिकेमध्ये होते. हा चित्रपट सुपरहिट झाला होता.