खूपच लहान वयामध्ये जगाचा निरोप घेतला या ५ क्रिकेटर्सनी, नंबर ३ चा तर फक्त २४ वर्षाचा होता !

By Viraltm Team

Updated on:

मृत्यू हे एक असे सत्य आहे जे कधीही नाकारता येत नाही. प्रत्येकाला एकना एक दिवस मरण हे येणारच आहे, मग तो एक सामान्य माणूस असो किंवा जगातील सर्वाधित श्रीमंत व्यक्ती असतो. आज आम्ही तुम्हाला क्रिकेट विश्वातील अशा ५ क्रिकेटपटूंबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यांनी अगदी लहान वयामध्ये या जगाचा निरोप घेतला.

रमण लांबा :- भारतीय टीमचा खेळाडू राहिलेल्या रमण लांबाने अवघ्या ३८ वर्षीच जगाचा निरीप घेतला. १९८८ मध्ये ढाका येथे बांग्लादेश विरुद्ध खेळताना एका सामन्यादरम्यान त्याच्या डोक्याला बॉल लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि तीन दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला. त्याने भारताकडून ४ कसोटी आणि ३२ एकदिवसीय सामने खेळले.रुनाको मोर्टन :- वेस्टइंडिजचा सर्वोत्कृष्ट फलंदाज असलेल्या रुनाको मॉर्टनचा २०१२ मध्ये त्रिनिदाद येथील घरी जात असताना कारची एका खांबाला धडक लागून मृत्यू झाला. त्यावेळी तो फक्त ३३ वर्षांचा होता. त्याने आपल्या संघासाठी १५ टेस्ट, ५६ वनडे आणि ७ टी-२० सामने खेळले आहेत.बेन होलिओक :- इंग्लंड क्रिकेट संघाचा खेळाडू बेन होलियोक वयाच्या २४ व्या वर्षी जग सोडून गेला. एका कार दुर्घटनेमध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याने इंग्लंडसाठी २ कसोटी आणि २० एकदिवसीय सामने खेळले. बेन इंग्लंडचा माजी कर्णधार अ‍ॅडम होलिओकचा तो लहान भाऊ होता.हॅन्सी क्रोनिए :- दक्षिण अफ्रीकेचा पूर्व कप्तान हॅन्सी क्रोनिएचे नाव मैच फिक्सिंगमुळे खूप चर्चेमध्ये राहिले होते. २००२ मध्ये एका विमान दुर्घटनेमध्ये त्याचे निधन झाले. त्यावेळी तो अवघ्या ३२ वर्षांचा होता. त्याने आपल्या संघासाठी ६८ कसोटी आणि १८८ एकदिवसीय सामने खेळले होते.फ्लिप ह्यूजेस :- ऑस्ट्रेलियाचा खेळाडू फ्लिप ह्यूजेसचे निधन अवघ्या २५ वर्षी झाले. त्याने ऑस्ट्रेलियाकडून २६ कसोटी आणि २५ एकदिवसीय सामने खेळले होते. सिडनी क्रिकेट मैदानावर शेफील्ड शील्ड सामन्यादरम्यान बाउंसर डोक्याला लागल्यामुळे दोन दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला.

Leave a Comment