‘आश्रम ३’ फेम इशा गुप्ताचं ते बो’ल्ड विधान चर्चेत, म्हणाली; “स्त्रियांनी शरीर दाखवलं तर…”

By Viraltm Team

Published on:

आश्रम ३ वेबसिरीज ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेअरवर नुकतीच प्रदर्शित झाली आहे. अभिनेता बॉबी देओल पुन्हा एकदा बाबा निरालाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. या वेबसिरीजच्या पहिल्या दोन भागांना दर्शकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

तिसऱ्या भागामध्ये बरेच बोल्ड आणि इंटिमेट सीन दाखवण्यात आले आहेत. या सीजनमध्ये अभिनेत्री इशा गुप्ता मुख्य भुमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. इशा गुप्ता आणि बॉबी देओल यांच्या बोल्ड सीनची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली.

इशा गुप्ता आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमी चर्चेमध्ये राहत असते. सध्या इशा गुप्ता पुन्हा तिच्या बोल्ड विधानामुळे चर्चेमध्ये आली आहे. जन्नत २, राज थ्री डी, चक्रव्यूह, बेबी, रुस्तम, टोटल धमाल यासारख्या चित्रपटांमध्ये इशा बोल्ड भूमिका करताना पाहायला मिळाली होती.

आश्रम ३ वेबसिरीजमध्ये इशाने सोनियाची दमदार आणि बोल्ड भूमिका साकारली आहे. नुकतेच इशाने बॉलीवूडमध्ये चांगले चित्रपट मिळत नसल्याबाबत आणि महिलांच्या समस्यांबाबत भाष्य केले आहे. इशाला जेव्हा बोल्डनेसमुळे होत असलेल्या ट्रोलिंगबद्दल विचारण्यात आले त्यावेळी तिने हे उत्तर दिले.

इशा म्हणाली कि आपल्या देशामध्ये हीच समस्या आहे, स्त्रियांना नेहमी जज केले जाते. त्यांच्यासोबत गैरवर्तन केले जाते. जर पुरुषांनी अंगप्रदर्शन केले तर त्यांना काहीच बोलले जात नाही पण जर स्त्रियांनी असे केले तर मात्र त्यांच्यावर टीका केली जाते. आपल्या देशामध्ये स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जातो.

आश्रम ३ मध्ये काम करण्याची संधी कशी मिळाली? यावर उत्तर देताना इशा म्हणाली कि हा खूपच रंजक किस्सा आहे. दुसऱ्या लॉकडाऊन दरम्यान मी माझ्या आईवडीलांसोबत दिल्लीमध्ये राहत होते. यादरम्यान मी मेरठमध्ये एका फंक्शनसाठी गेले होते आणि तिथे या वेबसिरीजबद्दल चर्चा सुरु होती.

आश्रमच्या बातम्या छापून आल्या होत्या. त्यानंतर मी ११-१२ दिवसांनंतर प्रदेशात गेले आणि प्रकाश झा यांचा मला फोन आला. त्यांना मला आश्रम ३ विषयी बोलायचे होते. काही दिवसांपूर्वी मी या वेबसिरीजचा भाग असते तर असा विचार करत होते आणि मला याच वेबसिरीजसाठी विचारले जात होते.

Leave a Comment