सिनेसृष्टी पुन्हा हादरली ! राजू श्रीवास्तव पाठोपाठ ‘या’ दिग्गज अभिनेत्रीचे निधन, दीर्घ आजाराशी देत होती झुंज…

By Viraltm Team

Published on:

लेजेंड्री अभिनेता अशोक कुमारची मुलगी भारती जाफरीचे मंगळवारी निधन झाले आहे. ती दीर्घकाळ आजाराने त्रस्त होती. अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती नंदिता दासने याबद्दल माहिती दिली होती. तिने भारतीची आठवण काढली आणि तिच्यासंबंधी क्षणांचा उल्लेख केला.

नंदिता म्हणाली कि ती नेहमी तिला खूपच जास्त मिस करेल. नंदिताने म्हंटले कि भारती जाफरी एक चैतन्यशील आणि आनंदी व्यक्ती होती आणि प्रत्येकजण तिच्या प्रेमाला आणि उदारपणाला नेहमी आठवत राहील.

नंदिता दास म्हणाली कि अनुराधा पटेल आणि कंवलजीत सिंह माझे फॅमिली फ्रेंड्स आहेत. भारती दीदीने वैचारिक स्वभावाने आम्हाला खूप प्रेम दिले. ती मला बर्थडे विष करणे किंवा प्रवासाचे फोटो माझ्यासोबत शेअर करायला ती कधीच विसरली नाही. मी तिला खूप मिस करेल आणि हे कधीच विसरू नये कि ती एक प्रतिभाशाली अभिनेत्री होती.

बॉलीवुड आणि टीव्ही अभिनेता कंवलजीत सिंहने देखील इंस्टाग्राम पोस्ट द्वारे चाहत्यांना भारती जाफरीच्या निधनाची बातमी दिली. त्यांनी भारतीचे अनेक फोटो देखील शेयर केले आहेत. त्यांनी फोटो शेयर करत लिहिले कि आमची लाडकी, भारती जाफरी, मुलगी, बहिण, पत्नी, आई, आजी, काकुर, शेजारी, मित्र आणि प्रेरणा २० सप्टेंबर रोजी आम्हाला सोडून गेली.

भारती जाफरीने हजार चौरासी की मां, सांस, दमन आणि देवी अहिल्या बाई सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तिने अभिनेता सईद जाफरीचा भाऊ हामिद जाफरी सोबत लग्न केले होते. अनुराधा पटेल तिची मुलगी आहे. रूपा वर्मा, प्रीति गांगुली, अरूप गांगुली तिचे भाऊ बहिण आहेत.

Leave a Comment