बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर आपल्या वेगळ्या स्टाईलमुळे प्रसिद्ध आहे. बॉलीवूड सेलेब्रिटी अनेक वेळा त्यांच्या सहकलाकारांसोबत मजामस्ती करताना पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ अर्जुन कपूर आणि अभिनेत्री तारा सुतारीयाचा सोशल मिडियावर वायरल होत आहे.

अर्जुन कपूर हा तारा सुतारिया, जॉन अब्राहम आणि दिशा पटानी यांच्यासोबत त्यांच्या आगामी एक व्हिलन २ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान हे कलाकार नुकतेच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये एकत्र आलेले पाहायला मिळाले.

यादरम्यानचा अर्जुन कपूरचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये अर्जुन कपूर आणि तारा सुतारीया पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता अर्जुन कपूर तारा सुतारीयाला डिवचताना पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री तारा सुतारीया स्वतःला वाचवताना दिसते पण तिने एकदम लहान ड्रेस घातल्यामुळे तिला अडचणीचा सामना करावा लागला. अशामध्ये जेव्हा अर्जुन कपूर तिला चिडवत असतो तेव्हा कॅमेऱ्यासमोर तिला अनकम्फर्ट फील होते. त्यानंतर ती परिस्थिती जाणून लगेच कॅमेऱ्यासमोर पोज देते.

तारा सुतारीया आणि अर्जुन कपूरचा हा व्हिडीओ सोशल मिडिया वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटिझन्स देखील हा व्हिडीओ शेयर करत आहे आणि व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंटच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

यादरम्यान अर्जुन कपूर आणि तारा सुतारीयाची केमेस्ट्री सर्वांनाच खूप आवडली. तर काहींचे असे म्हणणे आहे कि अर्जुन कपूरने तारा सुतारीयासोबत अशी जबरदस्ती करायला नको होती. ज्यामुळे कॅमेऱ्यासमोर तिला शर्मिंदा व्हावे लागले नसते.

दरम्यान एक विलेन २ चित्रपट २९ जुलै रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये अर्जुन कपूर सोबत तारा सुतारिया, जॉन अब्राहम आणि दिशा पटानी यांनी देखील मुख्य भूमिका साकारल्या आहेत. चित्रपट मोहित सुरी यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट अभिनेता रितेश देशमुखच्या एक विलेन चित्रपटाचा रिमेक आहे.