भारतामध्ये बहुतेक लोकांचा हा विचार असतो कि लग्नाच्या अगोदर शा रीरि क सं बंध बनवणे योग्य नसते. तर लग्नाच्या नंतर देखील दुसऱ्या सोबत अफेयर करू नये. लग्न ७ जन्माचे बंधन असते. यामुळे आपल्याला एकाचा जोडीदारासोबत आयुष्य घालवले पाहिजे. तथापि अनेक लोक या विचाराशी सहमत नाहीत. यामध्ये बॉलीवूड अभिनेता आणि मलायका अरोराचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरदेखील सामील आहेत.
वास्तविक अर्जुन कपूर सध्या त्याच्या आगामी निशेध सीजन-२ वेब सिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. एमटीवी के निशेध सीजन-२ च्या लॉन्च इव्हेंटमध्ये मिडियासोबत त्याने मुलाखत दिली. यादरम्यान त्याने लग्नाच्या अगोदर संबंध बनवणे आणि लग्नानंतर अनेक पार्टनरसोबत नाते ठेवण्यावर उघडपणे चर्चा केली. अर्जुनने ज्याप्रकारे उत्तर दिले ते ऐकल्यानंतर प्रत्येकजण हैराण राहिला.
अर्जुनला विचारले गेले कि भारताची खरी ओळख इथली मजबूत संस्कृती आणि कल्चर आहे. आपण इथे लग्नाच्या अगोदर से क्स करणे योग्य मानत नाही. अशामध्ये लग्नाच्या अगोदर किंवा लग्नाच्या नंतर मल्टीपल पार्टनर्स असणे किंवा त्यांच्यासोबत संबंध बनवणे याबद्दल तुझा काय विचार आहे. आपण एकदाच जगतो आणि एकदाच मारतो आणि लग्न देखील एकदाच करतो. तर यावर तुझे काय विचार आहेत ? लग्नाच्या अगोदर संबंध बनवणे आणि मल्टीपल पार्टनर ठेवणे योग्य आहे का?
या प्रश्नाचे उत्तर अर्जुनने वेगळे दिले. त्यांना म्हंटले कि, एका व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक चढ-उतार येत असतात. सुरुवातीला तुम्ही लोकांना भेटायला सुरुवात करता. नंतर अनेक रिलेशनशिपमध्ये राहता. त्यानंतर लग्नाचा विचार करता. कोणत्याहि रिलेशनशिप राहणे लग्नापेक्षा मोठी गोष्ट असते. हे लग्नाच्या स्टेजपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया असते. तथापि याआधी तुमचे मन जिज्ञासू असते आणि तुम्ही जीवनाचा शोध घेता.
अर्जुन पुढे म्हणाला कि आपण एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर लावेच लग्नाचा निर्णय घेत नाही. १८-१९ वयामध्ये तुम्ही हे सांगू शकत नाही कि समोरचा व्यक्ती तुमचा जोडीदार म्हणून योग्य आहे का नाही. तुम्हाला हे माहित नसते कि कोण तुमच्यासाठी योग्य आहे. तेव्हा प्रेमाची खरी समजत नसते. तुम्हाला वाटते कि हेच खरे प्रेम आहे. पण नंतर समजते कि तुम्हाला तुमच्या करियरवर फोकस करायचा आहे किंवा हा जोडीदार माझ्या भविष्यासाठी योग्य ठरणार नाही.
अर्जुन पुढे म्हणतो कि आपल्याला अनेकवेळा हे नंतर समजते कि आपण या नात्याला आणखी ताणू शकत नाही. कारण एकत्र राहत तुमच्यासोबत अनेक गोष्टी होतात ज्या तुम्हाला स्वीकार नसतात. तुमचा प्रश्न अनेक पार्टनरबद्दल आहे. पण हि एखादी व्हिडीओ गेम नाही. यामुळे तुमचा प्रश्न बदल. मग तुम्हाला एक लॉजिकल उत्तर स्वतःहून मिळेल.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.