बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी आपल्या नात्यामुळे चर्चेत असतात. दोघे जितके आपल्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत राहत नाहीत तितकेच ते आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहतात. दोघांची जोडी नेहमीच खूप चर्चेमध्ये असते.
अर्जुन आणि मलायकाच्या नात्याबद्दल नेहमीच चर्चा होतात. अनेकवेळा दोघांच्या नात्याबद्दल विचित्र अफवा देखील उडत असतात. मलायका आणि स्वतः बद्दल उडणाऱ्या अफवांवर अर्जुन कपूर कडवी प्रतिक्रिया देतो. आता पुन्हा एकदा अभिनेत्याने काही असेच केले आहे.
सोशल मिडियावर नुकतेच मलायका अरोराचं प्रेग्नंसीची बातमी आली आहे. या बातम्यांबद्दल जेव्हा अर्जुन कपूरला माहिती झाले तेव्हा तो चांगलाच भडकला. अशाप्रकारच्या बातम्या पसरवणाऱ्यावर तो चांगलाच भडकला. मलायकाच्या प्रेग्नंसीच्या बातम्या निव्वळ अफवा आहेत.
अर्जुन कपूरने चुकीच्या बातमीवर सोशल मिडियावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. त्याने एका आर्टिकलचा स्क्रीन शॉट शेयर केला आणि त्यासोबत लिहिले कि, अशाप्रकारच्या बातम्या इनसेंसिटिव आणि अनएथिकल आहेत. तुम्ही खूपच खालच्या पातळीला गेला.
आमच्याबद्दल सतत अशा बातम्या येत आहेत, तरीही आम्ही अशा बातम्यांवर नेहम्की दुर्लक्ष करत असतो. पण असे आर्टिकल्स मिडियामध्ये व्हायरल होतात आणि त्या खऱ्या ठरवल्या जातात. हे योग्य नाही. आमच्या पर्सनल लाईफसोबत खेळण्याची हिंमत करू नका.
मलायका आणि अर्जुन यांच्या नात्याला आता बराच काळ झाला आहे. दोन्ही कलाकार पाच वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. २०१७ मध्ये मलायकाने अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला होता आणि त्यानंतर ती अर्जुन कपूरला डेट करत आहे. तथापि हे देखील म्हंटले जाते कि अर्जुनमुळे मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला होता.
मलायका आणि अर्जुन एकमेकांवर खूप प्रेम करतात. दोघांचे रिलेशन कधीच कोणापासून लपून राहिलेले नाही. दोघांचे रिलेशन जगजाहीर आहे. कपल दरम्यान १२ वर्षे वयाचे अंतर आहे. असे असून देखील दोघांची केमेस्ट्री कमालीची आहे. अर्जुन ३७ वर्षाचा आहे तर मलायका ४९ वर्षाची आहे. मलायका अर्जुनपेक्षा १२ वर्षाने मोठी आहे.
अर्जुन आणि मलायकाचे चाहते आता दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांना अशा आहे कि पाच वर्षाच्या डेटिंग नंतर आता दोघे लवकरच विवाहबंधनात अडकू शकतात. आतापर्यंत दोघांच्या लग्नाच्या बातम्या अनेकवेळा आल्या आहेत. दोघांनी देखील लग्नाचे संकेत दिले आहेत, मात्र त्यांच्या लग्नाचा मुहूर्त कधी येतो हे पाहावे लागले.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.