बॉलीवूड अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अरबाज खान चित्रपटांपेक्षा त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेमध्ये राहते. अरबाजची पहिली पत्नी मलायका अरोरासोबतचा घटस्फोट खूपच चर्चेमध्ये राहिला. मलायकासोबत लग्न मोडल्यानंतर अरबाजच्या लाईफमध्ये अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानी आली. पण जॉर्जियासोबत अरबाज खानचे नाते संपुष्टात आले आहे का?
याचा खुलासा स्वतः जॉर्जियाने एका मुलाखतीदरम्यान केला आहे. अरबाजसोबत आपल्या इक्वेशनबद्दल तिने वक्तव्य केले आहे. जॉर्जियाने अरबाजला फक्त आपला एक चांगला मित्र असल्याचे सांगितले आहे. जॉर्जियानुसार तिचा आणि अरबाजचा लग्नाचा कोणताही विचार नाही.
दोघांचे नाते को रोना लॉकडाउननंतर खूप बदलले आहे. मुलाखतीमध्ये जॉर्जियाला तिच्या अरबाजच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. याचे उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली कि, मी मलायका आणि अरबाजच्या कुटुंबाला अनेकवेळा भेटली आहे. अरबाज फक्त माझा चांगला मित्र आहे. पण आमचा लग्नाचा कोणताहि प्लान नाही.
जॉर्जिया पुढे म्हणाली कि जसे कि मी म्हणाले होते कि अरबाज आणि आम्ही चांगले मतिर आहोत पण जेव्हा लग्नाचा प्रश्न येतो तेव्हा खरे सांगायचे झाले तर आमचा असा कोणताही प्लान नाही. लॉकडाउनने आम्हाला असे विचार करण्यास भाग पाडले. वास्तवामध्ये लॉकडाउन लोकांना एकतर जवळ घेऊन आले किंवा त्यांना वेगळे केले.
अरबाज खान आणि जॉर्जिया गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांच्या वयामध्ये जवळ जवळ २० वर्षाचे अंतर आहे. अरबाज खान आणि जॉर्जियाला नेहमी एकत्र टाइम स्पेंड करताना स्पॉट केले जाते. तथापि अनेक दिवसांपासून दोघे खूपच कमी स्पॉट होत आहेत.