मलायका अरोरापासून घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खानचे नाव विदेशी सुंदरी जॉर्जिया एंड्रियानीसोबत जोडले जात आहे. अनेक वेळा दोघे व्हेकेशनवर एकत्र पाहायला मिळत असतात. तर अरबाजसोबत नात्याबद्दल तर जॉर्जिया नेहमी चर्चेमध्ये राहते. पण त्यापेक्षा देखील जास्त ती आपल्या स्टाईलमुळे चर्चेमध्ये राहते.

जॉर्जिया जेव्हा घरातून बाहेर निघते तेव्हा कॅमेऱ्यामध्ये तिला टिपण्यासाठी लोक आतुर असतात. जॉर्जिया देखील कुठे कमी आहे ती नेहमी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवृन्म अशा पोस्ट करते कि पाहणारे तिच्यावर फिदा होतात.

जॉर्जियाच्या लेटेस्ट लुकबद्दल बोलायचे झाले तर ती यावेळी लाल सूट घालून खूपच सुंदर दिसत आहे. जॉर्जियाने आपल्या लुकला चाहत्यांसोबत शेयर केले आहे. समोर आलेल्या लेटेस्ट फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कि अभिनेत्री यादरम्यान लाल रंगाच्या स्ट्रॅपी सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. यासोबत तिने ओढणी गळ्याला चिकटवून घेतली आहे जी तिला आणखीनच हॉट टच देत आहे. यासोबत ऑक्सिडाईज मॅटेलच्या बांगड्या आणि झुमके जॉर्जियाच्या लुकमध्ये भर घालत आहेत. खुल्या केसांसोबत जॉर्जिया खूपच किलर दिसत आहे.

जॉर्जियाचा हा लुक पाहिल्यानंतर चाहत्यांचे म्हणणे आहे कि अरबाजची एक्स वाईफ मलायकाला देखील जॉर्जिया बोल्ड लुकने टक्कर देत आहे. जॉर्जिया सोशल मीडियावर खूपच सक्रीय राहते आणि नेहमी ती आपले एकापेक्षा एक बोल्ड आणि हॉट लुक्स चाहत्यांसोबत शेयर करत राहते. या जोडीच्या लग्नाची चाहत्यांना खूपच आतुरता लागून राहिली आहे.

जॉर्जिया एंड्रियानी इटलीची मॉडल आणि अभिनेत्री आहे सध्या बॉलीवूडमध्ये करियर बनवण्यासाठी ती प्रयत्न करत आहे. तथापि अजून तिला हि संधी मिळालेली नाही ज्याच्या ती शोधात आहे. बऱ्याच दिवसांपासून तिचे नाव अरबाज खानसोबत जोडले जात आहे, तर जॉर्जिया अनेकदा सुट्टीच्या दिवशी अरबाजसोबत पार्टी करताना दिसत असते. मलायका अरोरापासून घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज आणि जॉर्जिया एकमेकांना डेट करू लागले होते.