मलायकानंतर आता २० वर्षांनी लहान जॉर्जियाने देखील दिला अरबाज़ खानला डच्चू, म्हणाली; त्याचा…

By Viraltm Team

Published on:

अरबाज खान आपल्या कामापेक्षा आपल्या पर्सनल लाईफमुळेच खूप जास्त चर्चेमध्ये राहतो. मग मलायकासोबत झालेला घटस्फोट असो किंवा घटस्फोटा नंतर विदेशी अभिनेत्री आणि मॉडल जॉर्जिया एंड्रियानीसोबतचे रिलेशन असो. मॉडल जॉर्जिया एंड्रियानी एक इटालियन आहे आणि तिने अनेक मॉडलिंग प्रोजेक्ट्सवर काम केले आहे.

नुकतेच एका मुलाखतीदरम्यान मॉडल जॉर्जिया एंड्रियानीने अशा प्रकारची हिंट दिली आहे कि आता तिचे अरबाज खानसोबत कोणतेही रिलेशन नाही. इतकेच नाही तर जॉर्जियाने अरबाजला आपला बॉयफ्रेंड न म्हणता फक्त एक चांगला मित्र असल्याचे सांगितले आहे.

तिला जेव्हा लग्नाबद्दल प्रश्न विचारला गेला तेव्हा ती म्हणाली कि मी अरबाज आणि मलायकाच्या कुटुंबाला अनेकवेळा भेटले आहे. अरबाज आणि मी चांगले मित्र आहे पण लग्नाबद्दल बोलायचे झाले तर आमचे असे कोणतेही प्लानिंग नाही. लॉकडाऊनच्या काळात आम्हाला विचार करायला भाग पाडले गेले आणि लॉकडाऊननंतर आमचे नातेही बदलले.

अरबाज आणि जॉर्जिया दरम्यान रोमांटिक रिलेशनशिप संपले आहे याची माहिती हे दोघेच देऊ शकतात. सध्या दोघांना एकमेकांना डेट करून जवळपास चार वर्षे होऊन गेली आहेत. दोघांमध्ये २० वर्षे वयाचे अंतर आहे. याआधी दोघे अनेकवेळा एकत्र पाहायला मिळत होते पण गेल्या काही दिवसांचपासून ती खूपच कमी स्पॉट होत आहेत.

जॉर्जिया एंड्रियानी वास्तविक एक मॉडल आहे. तिने आपल्या करियरची सुरुवात मॉडलिंगने केली होती आणि नंतर अनेक अॅक्टिंग प्रोजेक्ट्समध्ये देखील ती पाहायला मिळाली. तिने २०१९ मध्ये रिलीज झालेल्या कॅरोलिन कामाक्षी या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रामध्ये डेब्यू केला होता. तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर वेलकम टू बजरंगपूर या मराठी चित्रपटामध्ये ती पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment