विराट कोहली आणि अनुष्का शर्माने असा साजरा केला मुलगी वामिकाचा वाढदिवस, शेयर केला क्युट फोटो…

By Viraltm Team

Published on:

विराट कोहलीची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने मुलगी वामिकाचा एक न पाहिलेला फोटो शेयर केला आहे. वामिकाचा ११ जानेवारी रोजी दुसरा बर्थडे सेलिब्रेट केला गेला. अनुष्का शर्माच्या या फोटोवर विराटने देखील क्युट प्रतिक्रिया दिली आहे.

अनुष्का शर्माने एका पार्कमध्ये बसलेला हा फोटो शेयर केला आहे. वामिका अनुष्काच्या कुशीमध्ये आहे, पण तिचा चेहरा दिसत नाही आहे. अनुष्का आणि वामिकाचा हा फोटो खूपच क्युट आहे. अनुष्काने हा फोटो शेयर करत कॅप्शन मध्ये लिहिले आहे कि दोन वर्षांपूर्वीचे माझे हृदय जे आणखीन खुलले आहे.

अनुष्का शर्माच्या या पोस्टवर विराट कोहलीने अनेक हार्ट इमोजी कमेंट केले आहेत. अनुष्का शर्मा आणि विराट कोहिलीने २०१७ मध्ये लग्न केले होते आणि २०२१ मध्ये या कपलला मुलगी वामिका झाली होती. एक दिवस अगोदर विराट कोहलीने एक हृदयस्पर्शी फोटो शेअर केला होता.

फोटोमध्ये तो अनुष्का आणि वामिका बीचवर फिरताना दिसत आहेत. त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते कि “रब्बा बख्शियां तू एन्नियान मेहरबानियां, होर तेरतों कुछ नी मंगदा, बस तेरा शुक्र अदा कर्दन. विराट कोहली सध्या श्रीलंका विरुध्द वनडे सीरीजमध्ये खेळत आहे.

श्रीलंका विरुद्ध विराट कोहलीने पहिल्या वनडेमध्ये धडाकेबाज शतक झळकावले. भारताने मंगळवारी श्रीलंकाला ६७ धावांनी पराभूत करत तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये १-० अशी आघाडली घेतली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

Leave a Comment