विराट कोहली आपला बर्थडे सेलिब्रेट करत आहे. आज विराट ज्या ठिकाणी आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही कि त्याच्यासाठी प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस सेलिब्रेशनचा आहे. विराट कोहलीचे चाहते आणि वेल विशर्स त्याला शुभेच्छा देत आहेत. आता अभिनेत्रीने विराट कोहलीला शुभेच्छा देत त्याचे काही न पाहिलेले फोटो शेयर केले आहेत. या फोटोंची खास बाब हि आहे कि अनुष्काने कॅप्शनमध्ये हे सांगिलते कि तो कसाही असो त्याच्यावर खूप प्रेम करते.
अनुष्का शर्माने विराट कोहलीचे काही रंजक आणि अनोखे फोटो शेयर केले आहेत. फोटो शेयर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आज तुझा बर्थडे आहे, तर अशामध्ये मी तुझे काही बेस्ट अँगल्स आणि फोटोज काढले आहेत. या पोस्टद्वारे तुला हे सांगायचे आहे कि मी तुझ्यावर स्टेट आणि फॉर्ममध्ये प्रेम करते. तू जसा आहेस, त्यामध्ये मी तुझ्यावर प्रेम करते. अनुष्का शर्माने विराट कोहलीचा जो फोटो शेयर केला आहे त्याला पाहून चाहते त्यावर भरभरून प्रेम करत आहेत. विराटने ज्याप्रकारे वामिकाला घेतले आहे तो क्षण खूपच सुंदर आहे.
अनुष्का शर्माच्या या पोस्टवर विराट कोहलीने कमेंट करत हसणारे इमोजी बनवले आहेत. त्याचबरोबर काही हार्ट इमोजी देखील पोस्ट केले आहेत. विराट कोहली सध्या टी२० वर्ल्ड कपच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. आतापर्यंत तर भारताने सामने जिंकले आहेत आणि चाहते आशा करत आहेत कि हि ट्रॉफी भारताच्या नावावर व्हावी.
अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री सध्या चकदा एक्स्प्रेसच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ती पती विराट कोहलीसोबत काही एंडॉर्समेंट्सवर देखील काम करत आहे. दोघांचे अनेक कमर्शियल्स एकत्र रिलीज झाले आहेत. अभिनेत्री नेहमी सोशल मिडियावर या चित्रपटाच्या तयारीचे अपडेट देताना पाहायला मिळाली आहे. अनुष्का शर्मासाठी हा चित्रपट खास आहे. ती चित्रपटामध्ये झूलन गोस्वामीच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.
View this post on Instagram