व्हीजे आणि प्रसिद्ध अभिनेत्री अनुषा दांडेकर तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे नेहमी चर्चेमध्ये राहत असते. सोशल मिडियावर अनुषाची तगडी फॅन फॉलोइंग आहे. अनुषा तिच्या इंस्टाग्राममुळे खूप चर्चेमध्ये आली आहे.
अनुषाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक लहान मुलीसोबतचा फोटो शेयर केला आहे. ज्यानंतर तिने एक मुलगी दत्तक घेतल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या आहेत. यावर आता अनुषाने स्पष्टीकरण देत ती तिची खरी मुलगी नसल्याचे सांगितले आहे.
अनुषाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एका छोट्या मुलीसोबतचे फोटो शेयर केले. फोटो शेयर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, शेवटी माझ्याकडे एक लहान मुलगी आहे, जी माझी आहे असे मी नक्कीच म्हणू शकते.
माझ्या या गोड परीचे नाव सहारा आहे. माझे प्रेम. मी तुझी नेहमीच काळजी घेईन. नेहमी तुझे रक्षण करेन. खूप खूप प्रेम माझ्या मुली. तुझी आई. अभिनेत्रीने शेयर केलेली हि पोस्ट पाहिल्यानंतर तिचे चाहते हा अंदाज लावत आहेत कि तिने एक मुलगी दत्तक घेतली आहे.
पण अनुषाने ती माझी खरी मुलगी नाही असे म्हणत इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे कि, सर्वांनी मला खूप खूप प्रेम दिले. हे खूपच गोड आहे. पण ती माझी खरी मुलगी नाही तर माझी गॉड डॉटर जी माझी आहे असे मी म्हणू शकते.
इंस्टाग्रामवर आणखी एक स्टोरी पोस्ट करत अनुषाने तिच्या खऱ्या आईविषयी सांगितले आहे. अनुषाने लिहिले आहे कि, चिमुकलीची खरी आई झोआ आणि आजी संगीता. मी तिची गॉडमदर आहे. म्हणजेच माझी मैत्रीण झोआ नंतर सहाराला जेव्हा माझी गरज भासेल तेव्हा मी तिच्यासाठी उभे राहीन.
अनुषा अजूनही अविवाहित आहे. ती सोशल मिडियावर नेहमी अॅक्टिव असते. ती अनेकवेळा तिचे फोटो आणि व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर करत असते. अनुषा दांडेकर एक उत्कृष्ठ होस्ट, गायिका आणि व्हीजे देखील आहे.