अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू सध्या त्यांच्या दोबारा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. यादरम्यान होस्ट सिद्धार्थ कननने दोघांची एकत्र मुलाखती घेतली. आता सोशल मिडियावर या मुलाखतीचा एक व्हिडीओ चांगला व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दिग्दर्शक अनुरागने तापसीबद्दल अतिशय घाणेरडे विधान केले आहे.
जिथे एकीकडे त्यांचे हे वक्तव्य ऐकल्यानंतर सर्व लोक हैराण आहेत, तर व्हिडीओमध्ये दिसत असलेली तापसी त्याच्या या विधानावर हसताना दिसत आहे. तथापि तापसी दोन सेकंदासाठी विचारात पडली होती कि अनुरागने तिच्याबद्दल असे का म्हंटले. पण नंतर तिने आपले एक्सप्रेशंस कॅमेऱ्यामध्ये येऊ दिले नाहीत. आता व्हिडीओ समोर आल्यानंतर दोघांना सोशल मिडियावर चांगले ट्रोल केले जात आहे.
या व्हिडीओमध्ये दोघे रणवीर सिंहच्या न्यू ड फोटोशूटबद्दल बोलत होते. यादरम्यान सिद्धार्थ, अनुरागला विचारतो कि, सर तुम्ही देखील असाच एक फोटोशूट करावा. माझ्यावर विश्वास ठेवा ज्याप्रकारे तुमचे पोट बाहेर येईल त्यामुळे फोटोशूट खूपच व्हायरल होईल.
यावर तापसी म्हणते कि प्लीज हॉरर शो सुरु करू नका, याचे उत्तर देताना सिद्धार्थ म्हणतो कि तू खूपच कॉम्प्लेक्स आहेस आणि जळतेस कारण अनुराग सर व्हायरल होतील आणि त्यांना पब्लिसिटी मिळेल. यावर अनुराग म्हणतो कि, हा ती तर मला घाबरतेच, तिला तर माझ्यावर फक्त यामुळे कॉम्प्लेक्स आहे कि माझे स्त न तिच्यापेक्षा मोठे आहेत.
आता हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होताच लोकांनी अनुराग आणि तापसीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. सोशल मिडिया युजर्स अनुरागच्या बेताल वक्तव्यासाठी आणि तापसीला असभ्य वर्तणूकिसाठी ट्रोल करत आहेत. एका युजरने लिहिले आहे कि विनाश काले विपरीत बुद्धि. तर एका दुसऱ्या युजरने लिहिले आहे कि आता याच गोष्टी राहिल्या आहेत तुमच्याजवळ करण्यासाठी. याशिवाय एकाने कमेंट केली कि, विनोद आणि मर्यादा ओलांडण्यादरम्यान एक छोटी लाईन देखील असते.
View this post on Instagram