मित्र सतीशच्या अंतिम यात्रेमध्ये अनुपम खेर यांना अश्रू अनावर, व्हिडीओ झाला व्हायरल…

By Viraltm Team

Updated on:

जो आम्हाला हसवायचा, तो आता कायमचा शांत झाला आहे. आम्ही प्रसिद्ध विनोदी अभिनेते सतीश कौशिक यांच्याबद्दल बोलत आहेत. हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याचा मृ’त्यू झाला. कुटुंब आणि मित्रांमध्ये सध्या शोककळा पसरली आहे. होळीच्या पार्टीमध्ये सामील होण्यासाठी सतीश कौशिक दिल्लीला आले होते. कोणाला माहित होते कि अभिनेता अशाप्रकारे सर्वांचा निरोप घेईल. सर्वात मोठा धक्का तर त्यांची पत्नी आणि ११ वर्षाच्या मुलीला बसला आहे. दोघांना आवरणे खूपच कठीण झाले आहे.

सतीश कौशिक यांचे पार्थि’व शरीर अंतिम संस्कारसाठी वर्सोवा येथील स्मशा’नभूमीत पोहोचले. दिवंगत अभिनेता पंच’तत्त्वात विलीन झाला आहे. अनुपम खेरचा एक व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते आपल्या मित्राच्या अंतिम यात्रेमध्ये निरोप देताना ढसाढसा रडताना दिसत आहेत.

सतीश कौशिक यांचे पार्थि’व शरीर अंतिम संस्कारसाठी रुग्णवाहिकेत नेण्यात आले. त्यामध्ये अंतिम निरोप देण्यासाठी अनुपम खेर देखील उपस्थित होते. अभिनेत्याचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये त्यांना अश्रू अनावर होताना दिसत आहेत. सतीश आणि अनुपम यांची मैत्री ४५ वर्षापासून होती.

सलमान खान देखील सतीश कौशिक यांना अंतिम निरोप देण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचला होता. याशिवाय शिल्पा शेट्टी, विक्की कौशलचे वडील, रवी किशन देखील अंतिम दर्शनासाठी सतीश कौशिक यांच्या घरी पोहोचले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

Leave a Comment