“…म्हणून मला कपडे काढून घराबाहेर…” प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला आयुष्यामधील ‘तो’ किस्सा.

By Viraltm Team

Published on:

अभिनेता अनुपम खेर बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी हिंदी, इंग्रजी सह भारतामधील अनेक भाषेच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच त्यांच्या ऊंचाई चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन, बोमन इराणी, नीना गुप्ता, डॅनी डॅन्झोपा हे दिग्गज कलाकार देखील मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

सुरज बडजातियाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चार जिवलग मित्रांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची स्टोरी आहे. चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला आहे. सध्या चित्रपटामधील कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

यादरम्यान नुकतेच एका मुलाखतीदरम्यान अनुपम खेर यांनी त्यांच्या आयुष्यामधील एक किस्सा शेयर केला. मुलाखतीदरम्यान बोलताना ते म्हणले कि शाळेच्या एका कार्यक्रमामध्ये पैसे भरण्यासाठी मला आईने पैसे दिले होते. नंतर तिला माझ्या दप्तरामध्ये त्यातील काही पैसे सापडले.

आता चोरी केल्यानंतर मार खायला मिळणार हे नक्की होते. अनुपम खेर पुढे म्हणाले कि मी त्यावेळी खूप मार खाल्ला होता, मला कपडे काढून घराबाहेर उभे केले होते. त्यावर त्यांची आई म्हणाली कि, तर तर तुला मारायला नको होत का ?

मी आणि माझा छोटा भाऊ राजूने आईचा खूप मार खाल्ला आहे. लहानपणी आम्हाला आई एका झाडाच्या काठीने बेदम मारायची. एकदा त्या काठीच्या विषाने मी आजारी पडलो. डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर म्हणाले होते कि हाताने मारा पण काठीने मारू नका.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

Leave a Comment