व्हायरल झाला ‘अंजली अरोरा’चा फेक MMS, रडत रडत म्हणाली; माझी देखील फॅमिली…

By Viraltm Team

Published on:

कंगना रनौतच्या लॉक अप शोमध्ये दिसलेली अंजली अरोराची सोशल मिडियावर तगडी फॅन फॉलोइंग आहे. अंजलीचे सैया दिल में आना रे गाणे सध्या खूपच व्हायरल होत आहे. गाणे रिलीज झाल्यानंतर ती खूपच वादात सापडली. सोशल मिडियावर तिचा एक व्हिडीओ एका मेसेजसोबत व्हायरल झाला. असे म्हंटले जात आहे कि हा MMS अंजली अरोराचा आहे.

आता अंजली या प्रकरणामध्ये मौन सोडले आहे आणि व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत कि, जर त्यांच्या कुटुंबामधील एखाद्या सदस्यासोबत असे झाले तर कसे वाटेल ? एका नवीन मुलाखतीमध्ये कथित MMS व्हिडीओ बद्दल बोलताना अंजली इमोशनल होऊन रडू लागली. तिने हे देखील म्हंटले कि हे पहिल्यांदाच घडले नाही तर त्यांच्या पॅरेंट्सनी याआधी देखील तक्रार दाखल केली आहे.

सिद्धार्थ कन्नडसोबत बातचीत दरम्यान अंजलीने या विवादित व्हिडीओ बद्दल बोलताना म्हंटले कि, मला माहित नाही कि ते काय करत आहेत. माझे नाव लावून, माझा फोटो लावून, हा अंजली अरोराचा MMS आहे, हि ती आहे. मला नाही माहिती ते काय करत आहेत. यासर्वांनी केले आहे. यांची देखील फॅमिली आहे, हे सांगताना अंजली रडू लागली.

ती पुढे म्हणाली कि, कधी कधी मला वाटते हे लोक असे का करत आहेत ? ज्यामध्ये मी नाहीच, त्याला इतके का पसरवत आहेत. युट्युबवर फालतू व्हिवसाठी, कि हा अंजली अरोराचा MMS आहे. माझी देखील फॅमिली आहे, माझा भाऊ आहे, माझी बहिण आहे, माझे छोटे भाऊ आहेत जे हे सर्व पाहतात. अंजलीने म्हंटले कि तिला बनवणारे लोकच हे सर्व करत आहेत हे पाहून दुख होते.

अंजली म्हणाली कि हे पहिल्यांदाच झालेले नाही, ती जेव्हा लॉक अप शोमध्ये आली तेव्हा तिला माहित झाले कि याअगोदरच हे सर्व सुरु आहे. शोच्या चौथ्या हप्त्यामध्ये असे काही झाले होते आणि तिच्या आईवडिलांनी तक्रार दाखल केली होती. अशाप्रकारचे व्हिडीओ शेयर करणाऱ्या लोकांना अंजली म्हणाली कि, मी तुमचे काय बिघडले आहे ? मी काय केले आहे ? मी ती नाहीच.

तुम्ही लोक मला प्रेम देत आहेत, मला इतके सपोर्ट करत आहात आणि अशा गोष्टी करत आहात. मला माहित नाही कि लोक असे का करत आहेत. अशा गोष्टी करण्यापूर्वी ते एकदा देखील विचार करत नाहीत कि एखाद्याच्या कुटुंबाचे काय होईल. मी फक्त २१ वर्षाची आहे. मी या गोष्टींसाठी तयार नाही.

अंजलीने पुन्हा एकदा असे घाणेरडे कृत्य करणाऱ्या लोकांना प्रश्न विचारताना म्हणाली कि, मला समजते कि हे सर्व नॉर्मल झाले आहे. कोणाचाही फोटो एडीट करणे, कोणाचाही व्हिडीओ एडीट करणे. यामध्ये लोकांना मजा येते आणि खूपच कुल होऊन म्हणतात. बघा तिचे हे होत आहे. तुम्ही कोणाच्या अब्रूशी खेळत आहात तुम्हाला लाज वाटत नाही का ? जर तुमच्या आई, बहिणसोबत असे झाले तर तुम्हाला काय वाटेल ?

Leave a Comment