बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरची धाकटी लेक रिया कपूरच्या लग्नाला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. लागाच्या पहिल्या वाढदिवसानिमिता रिया कपूरने पती करण बुलानीला रोमँटिक पद्धतीनं शुभेच्छा देत काही फोटो शेयर केले आहेत. रियाने केलेली पोस्ट सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.
रिया कपूरने शेयर केलेले प्राईव्हेट फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिने हे फोटो शेयर केले आहेत. पण रिया आणि तिच्या पतीचा हा आत्ताच फोटो नाही तो जुना फोटो आहे. त्याच्यबरोबर फोटो पाहिल्यानंतर हे देखील समजते कि हे फोटो दोघांच्या एकांतामधील आहेत.
हा फोटो रिया आणि करणच्या लग्नानंतरचा असल्याचे सांगितले जात आहे. फोटोमध्ये रिया आपली डायमंड रिंग फ्लॉन्ट करताना पाहायला मिळत आहे. पहिल्या फोटोमध्ये रिया आपल्या पतीसोबत खूपच कोजी दिसत असून ती त्याला कीस करत आहे.
दुसऱ्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कि ती हसताना दिसत आहे. फोटो शेयर करताना रियानं कॅप्शन देखील दिलं आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे कि, माझ्या नवऱ्याला पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हे आमच्या एंगेजमेंटच्या रात्रीचे फोटो आहेत, ज्यामध्ये आमचे रिलेशनशिप स्पष्टपणे दिसत आहे.
View this post on Instagram
फक्त तू आणि मी, पुढे कसलीही परिस्थिती असो मला फक्त हेच हव आहे. मी नेहमीच तुझ्यावर प्रेम करत राहीन. १३ वर्षे एकत्र राहिलो अजून ११३ वर्षे एकत्र राहायचे आहे. अनिल कपूरची लेक रिया कपूरने अजून फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केलेला नाही. रियाने अभिनेत्री बनण्याऐवजी निर्मिती क्षेत्रामध्ये करियर केले. १४ ऑगस्ट २०२२ रोजी तिच्या लग्नाचा वाढदिवस होता. तिने गेल्या वर्षी तिचा बॉयफ्रेंड करण बुलानीशी लग्न केले होते.