बॉलीवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंहची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. चाहते तिच्या अभिनयाचे दिवाने आहेत. अमृता अरोराने आपल्या करियरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. पण ती सध्या चित्रपटांपासून दूर आहे. ती नुकतेच २९ एप्रिल २०२२ रोजी रिलीज झालेल्या हीरोपंती २ चित्रपटामध्ये दिसली होती. ज्यामध्ये तिने अप्रतिम अभिनय केला होता. चाहत्यांना चित्रपटामधील तिचा अभिनय खूपच पसंद आला होता. विशेष म्हणजे प्रोफेशनल लाईफसोबत अमृता पर्सनल लाईफमुळे देखील खूपच चर्चेमध्ये राहत असते. यावेळी देखील असेच काही झाले आहे.
नुकतेच मुलाखतीदरम्यानचा तिचा एक खुलासा खूपच व्हायरल होत आहे. व्हायरल खुलास्यामध्ये अभिनेत्री आपल्या एक्स हसबंड सैफ अली खान बद्दल बोलताना दिसली. वास्तविक हा खुलासा दोघांच्या लग्नाच्या अगोदरचा म्हणजे १९९९ मधला आहे. जो सध्या खूपच चर्चेमध्ये आला आहे.
१९९१ मध्ये दोन्ही कलाकारांनी लग्न केले होते. ज्यानंतर त्यांना दोन मुले सारा अली खान आणि इब्राहिम अली खान झाले. दोघांचे लग्न अनेक दिवस टिकले नाही आणि त्यांनी २००४ मध्ये घटस्फोट घेतला. वेगळे होऊन देखील अमृता आणि सैफ नेहमी आपल्या रिलेशनमुळे चर्चेचा विषय बनलेले असतात.
अभिनेत्री एका चॅट शोमध्ये पती सैफ सोबत पोहोचली होती. जिथे ती म्हणाली कि ती इतर अभिनेत्रींप्रमाणे बिकिनी घालणार नाही. ती एक घरगुती आणि संस्कारी महिला आहे. जिला नम्रपणे बोलायला आवडते. जयंतर ती म्हणाली कि तिच्या काळामध्ये ती खूपच बेधडक होती आणि अभिनेत्यांसोबत ऑन स्क्रीन रोमांस करत होती. पण आता नाही आता ती स्ट्रॉन्ग आहे. पण तिला आता गोष्टी शांततेने करायला आवडतात. होस्ट सिमी ग्रेवाल तिला जेव्हा विचारले कि सैफला इतर अभिनेत्रींसोबत रोमांस करताना पाहते तेव्हा तिला कसे वाटते, यावर तिचे उत्तर चकित करणारे होते.
ती म्हणाली कि मी यावर लक्ष देत नाही, कारण तिने देखील कधी हे केले आहे. यामुळे सैफ जे काही करत आहे ते योग्य आहे. पण कधी कधी तिला सैफला फ्रायपॅनने मारावेसे वाटते. ज्यावर सैफ चेष्टेमध्ये म्हणतो कि तिने असे याआधी देखील केले आहे. त्यांचा हा खुलासा खूपच व्हायरल होत आहे. अमृतापासून वेगळे झाल्यानंतर सैफने २०१२ मध्ये बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरसोबत लग्न केले होते. ज्यानंतर त्याला दोन मुले झाली, तैमुर अली खान आणि जाहंगीर अली खान. सैफ नेहमी आपल्या चारी मुलांसोबत पाहायला मिळत असतो.