हिंदी फिल्म जगतामध्ये खलनायकांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोठ्या पडद्यावर एखाद्या अभिनेत्याला विलेनच्या रुपात पाहिल्यानंतर त्याला खऱ्या आयुष्यामध्ये देखील विलेन मानले जात होते. बॉलीवूडच्या अशा दिग्गज खलनायकांपैकी अमरीश पुरी हे एक नाव समोर येते.
अमरीश पुरी यांनी एकापेक्षा एक उत्कृष्ट भूमिका साकारल्या. अभिनेते अमरीश पुरी यांनी बॉलीवूडचा टॉप विलेन मानले जात असे. तथापि आज ते आपल्यामध्ये नाहीत. अमरीश पुरी यांनी पॉजिटिव्ह आणि कॉमिक रोल देखील केले पण जेव्हा ते मोठ्या पडद्यावर खलनायक बनले तेव्हा भल्या भल्यांची घाबरगुंडी उडाली.
आज भलेहि ते आपल्यामध्ये नसले तरी त्यांनी केलेल्या भूमिकांमुळे ते आज देखील दर्शकांमध्ये जिवंत आहेत. अमरीश पुरी यांनी रेशमा और शेरा चित्रपटामधून आपल्या बॉलीवूड करियरची सुरुवात केली होती. पण एक खलनायक म्हणूनच त्यांना सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली.
तथापि पडद्यामागे देखील असे अनेक किस्से घडले ज्यामुळे ते नेहमीच चर्चेमध्ये राहिले. आज आपण त्यांच्या आयुष्याशी संबंधीत एक किस्सा जाणून घेणार आहोत. अमरीश पुरी यांनी चित्रपटाच्या सेटवर अनेक दिग्गज हिरोंसोबत पंगा घेतला आणि त्यांची हालत खराब केली होती.
तथापि हा किस्सा अमरीश पुरी रियल लाईफसंबंधी आहे. त्यांनी बॉलीवूडच्या एका सुपरस्टारला चुकीचे शब्द बोलले होते. इतकेच नाही तर असे देखील म्हंटले जाते कि त्यांनी रागाच्या भरात त्याच्यावर हात देखील उचलला होता. अमिरीश पुरी हे ९० च्या दशकामधील सुपरस्टार गोंविदावर नाराज झाले होते.
अमरीश पुरीने रागाच्या भारत गोविंदाला गंदी नाली का किडा असे देखील म्हंटले होते. इतकेच नाही तर गोंविदाला कानशिलात देखील लगावली होती. तसे तर अमरीश पुरी एक उत्कृष्ठ कलाकार होते ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये कलाकारांसोबत नेहमी चांगले संबंध ठेवले.
झाले असे होते कि चित्रपटाच्या शुटींगदरम्यान गोविंदा रात्रीच्या वेळी शुटींगला पोहोचला होता तर शुटींगची वेळ सकाळची होती. यामुळे अमरीश पुरी त्याच्यावर नाराज झाले होते. अशामध्ये अमरीश पुरी आपल्या रागावर नियंत्रण ठेऊ शकले नाहीत. इतकेच नाही तर त्यांनी रागाच्या भरात गोविंदावर हात देखल उचलला होता.
अमरीश पुरीसोबत काम करणाऱ्या एका अभिनेत्याने सांगितले कि ते नेहमी त्यांच्या सोबतच्या कलाकारांसोबत चांगली वागणूक करायचे. त्यांनी आपल्या सफलतेवर कधीच घमंड केला नाही. चित्रपटाच्या सेटवर त्यांना नेहमी इतर कलाकारांकडून सन्मान मिळायचा. आपल्या ३५ वर्षाच्या करियरमध्ये अमरीश पुरी यांनी तब्बल ४०० चित्रपटांमध्ये काम केले होते.
त्यांनी नायक, मिस्टर इंडिया, दामिनी सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारून सर्वांनाच घाबरवले होते. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, मुझसे शादी करोगी, घायल आणि विरासत सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारून त्यांनी दर्शकांची माने देखील जिंकली.