महानायक, बॉलीवूडचे शहंशाह आणि अँग्री यंग मॅन म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन ८० वर्षाचे झाले आहेत. पाच दशकांपेक्षा देखील जास्त काळापासून मोठ्या पडद्यावरून दर्शकांच्या मनावर राज्य करणारे अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस ११ ऑक्टोबर रोजी असतो. अमिताभ बच्चन यांचे पूर्ण नाव अमिताभ हरिवंश राय श्रीवास्तव बच्चन आहे. अमिताभ बच्चनची कधी काळी ५०० रुपये कमाई होती, पण आज त्यांची करोडो रुपयांची संपत्ती आहे.
आज ते ज्या ठिकाणी आहेत तिथे पोहोचण्यासाठी खूप मेहनत लागते, खूप रिजेक्शन झेलावे लागतात. आपल्या अवाच्या बळावर अमिताभ बच्चन यांनी हजारो लोकांना रोजगार दिला, त्यांच्या आवाजाला सुरुवातीला रिजेक्ट केले गेले होते. अमिताभन बच्चनला रिजेक्ट केले गेले होते. अमिताभन बच्चनला रिजेक्ट करण्यासाठी कोणी त्यांना टोमणे मारले तर कोणी उंचीचा मुद्दा उपशिती केला. त्यांच्या उंचीमुळे त्यांना उंट देखील म्हंटले गेले.
अमिताभ बच्चनबद्दल गुगलवर देखील अनेक गोष्टी सर्च केल्या जातात. ते कौन बनेगा करोड़पति मधून किती कमाई करतात. अमिताभ एका जाहिरातीसाठी किती फीस घेतात. त्यांच्याजवळ किती बंगले आहेत, मृत्यूपत्रामध्ये काय काय आहे. आपण इथे त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
अमिताभ बच्चन कौन बनेगा करोड़पतिच्या प्रत्येक सीजनमध्ये प्रती एपिसोड ४-५ करोड रुपये फीस घेतात. माहितीनुसार कौन बनेगा करोड़पतिच्या सुरुवातीच्या सीजनमध्ये अमिताभ यांची प्रती एपिसोड १-१.५ करोड रुपये फीस राहिली. पण कौन बनेगा करोड़पतिच्या पहिल्या सीजनमध्ये अमिताभ बच्चनने प्रत्येक एपिसोडसाठी फक्त २५ लाख रुपये फीस घेतली होती.
गेल्या ५३ वर्षांमध्ये अमिताभ बच्चनच्या चित्रपटांमधून होणाऱ्या कमाईमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ७० आणि ८० च्या दशकामध्ये अमिताभ एक चित्रपटासाठी ५० हजार ते २० लाख रुपये इतकी फीस घेत होते. पण सध्या हि फीस ५-७ करोड रुपये प्रती चित्रपट आहे. माहितीनुसार अमिताभ बच्चनने आनंद आणि चुपके चुपके सारख्या चित्रपटांसाठी ५० हजार रुपये फीस घेतली होती. तर डॉन साठी अडीच लाख आणि मर्द आणि कुली साठी ८-१० लाख रुपये फीस घेतली होती. अशाप्रकारे अमिताभच्या फीसमध्ये हळू हळू वाढ झाली. त्यांनी खुदा गवाह साठी ३० लाख रुपये तर पिंक साठी ८ करोड रुपये आणि पा साठी ४ करोड रुपये घेतले होते.
अमिताभ बच्चन ८० व्या वर्षी ज्या प्रकारे काम करत आहेत. एकामागून एक चित्रपट साईन करत आहेत ते खूपच प्रेरणादायी आहे. २०२१ मध्ये अमिताभ यांनी ब्रह्मास्त्र: पार्ट, चूप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट आणि गुडबाय सारखे चित्रपट रिलीज झाले आहेत. त्यांच्या जवळ अजून ६ चित्रपट आहेत.
अमिताभ प्रॉपर्टीमध्ये देखील खूप गुंतवणूक करत आहेत. २०२१ मध्ये अमिताभ बच्चनने ३१ करोड रुपयांचे घर खरेदी केले होते आणि सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांनी मुंबईच्या एका पॉश भागामध्ये एक पूर्ण फ्लोर खरेदी केला. अमिताभ बच्चनने हे घर फोर बंगलो एरियाच्या पार्थेनोन बिल्डींगच्या ३१ व्या फ्लोरवर खरेदी केले, जे १२ हजार स्क्वेअर फिट आहे. अमिताभ बच्चन सध्या जलसामध्ये कुटुंबासोबत राहतात. त्यांच्याजवळ अरबो रुपयांची संपत्ती आहे.
Acknowledge च्या एका रिपोर्टनुसार २०२२ मध्ये अमिताभ बच्चनचे नेट वर्थ ३१९० करोड रुपये आहे. ते वर्षाला ६० करोड रुपयांची कमाई करतात. अमिताभ बच्चनने २०१३ मध्ये देखील एक प्रॉपर्टी खरेदी केली होती. त्यांनी जुहू स्थित आपल्या जलसा बंगल्यामागे आणखी एक बंगला खरेदी केला होता. ज्याची किमत ५० करोड रुपये पेक्षा जास्त आहे.
सध्या अमिताभ बच्चन यांच्याजवळ पाच बंगले आहे, ज्यांमध्ये प्रतीक्षा, जलसा, जनक आणि वत्स सामील आहेत. याशिवाय इलाहाबादमध्ये देखील अमिताभ यांचे एक पैतृक घर आहे. अमिताभ बच्चनची गणना आज बॉलीवूडच्या सर्वात जास्त कमी करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये होते.