महानायक, बिग बी, बॉलीवूडचे शहंशाह, बॉलिवुडचा अँग्री यंग मॅन आणि दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चनने आपल्या जीवनामधील आठ दशक पूर्ण केले आहे. अमिताभ बच्चनसारखे कोणीच नाही. बिग बी फिल्मी जगतामध्ये आज देखील सक्रीय आहेत.
अमिताभ बच्चन प्रत्येक वर्षी ११ ऑक्टोबरला आपला वाढदिवस साजरा करतात. ११ ऑक्टोबर रोजी बिग ८० वर्षाचे झाले आहेत. महानायकचा जन्म ११ ऑक्टोबर १९४२ रोजी अलाहाबाद (आता प्रयागराज) येथे झाला होता. अलाहाबाद सोडल्यानंतर एक तरुण स्वप्नांची नगरी मुंबईमध्ये आला आणि नंतर संपूर्ण जगामध्ये त्याने प्रसिद्धी मिळवली.
देशामधून अमिताभ बच्चन यांना चाहते वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. बिग बीच्या घराबाहेर रात्री चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. मुलगी श्वेता बच्चन नंदासोबत अमिताभ बच्चन घरामधून बाहेर आले आणि आपल्या चाहत्यांना अभिवादन केले. आज देखील बिग बीच्या लोकप्रियतेत कोणतीही घट झालेली नाही.
अमिताभ बच्चनची जादू आज देखील पूर्वीसारखीच आहे. ५० वर्षापूर्वी देखील अमिताभ बच्चनला खूप प्रेम आणि सम्मान मिळत होता. तर आज देखील तेच दृश्य पाहायला मिळते. भरपूर प्रसिद्धी मिळवल्यानंतर बिग बीनी अमाप संपत्ती देखील कमवली. आज आपण त्यांच्या संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत.
बिग बी जितके लोकप्रिय आणि सफल आहेत तितकीच त्यांच्या संपत्ती देखील त्याच दर्जाची आहे. ते फिल्म इंडस्ट्रीमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत अभिनेता आहेत. इतकेच नाही तर त्यांच्या गणना जगातील श्रीमंत अभिनेत्यांमध्ये देखील केली जाते. माहितीनुसार बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती जवळ जवळ ३५०० करोड रुपये आहे.
अमिताभ बच्चन कमाईच्या बाबतीत आजदेखील मोठमोठ्या स्टार्सला मागे टाकतात. ते दर महिन्याला ५ करोड रुपयांची कमाई करतात तर वर्षभरामध्ये बिग बीची कमाई ६० करोड रुपये इतकी होते. चित्रपटाशिवाय त्यांची कमाईचा मुख्य स्रोत त्यांचा टीव्ही शो कौन बनेगा करोड़पति, ब्रँड एंडोर्समेंट्स आणि जाहिराती देखील आहेत.
बिग बीला सुरुवातीला फक्त ८०० रुपये मिळत होते. बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी त्यांनी अनेक ठिकाणी काम केले होते. यादरम्यान त्यांनी कोलकातामध्ये एका कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले होते. यादरम्यान त्यांना महिन्याला ८०० रुपये पगार मिळत होता.
मायानगरी मुंबईमध्ये भाड्याने घर मिले खूपच कठीण आहे. तर बिग बीचे मुंबईमध्ये एक दोन नाही तर पाच आलिशान बंगले आहेत. अमिताभ बच्चन आपल्या कुटुंबासोबत जलसा बंगल्यामध्ये राहतात. याची किंमत १२० करोड ते १६० करोड इतकी आहे. याशिवाय त्यांच्या इतर तीन बंगले प्रतीक्षा, जनक आणि वत्स यांची किंमत करोडोमध्ये आहे. नुकतेच बिग बीने ३१ करोड रुपये देऊन आणखी एक घर खरेदी केले होते. अमिताभ बच्चन यांचे प्राईव्हेट जेट देखील आहे. ज्याची किंमत जाणून तुमचे होश उडतील. बिग बी जवळ जे प्राईव्हेट जेट आहे त्याची किंमत २६० करोड रुपये इतकी सांगितली जाते. यामधून ते नेहमी आपली कुटुंबासोबत प्रवास करताना पाहायला मिळतात.