पुष्पा २ साठी अल्लू अर्जुनची फीस जाणून तुमचे देखील होश उडतील, त्याच्या समोर हिरोईनला मिळत आहे फक्त ‘चिल्लर’

By Viraltm Team

Published on:

साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा द राइज चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त सुपरहिट झाला. या चित्रपटाने शानदार प्रदर्शन केले. चित्रपटाच्या स्टोरीसोबत गाण्यामधील हुक स्टेप्ट जगभरामध्ये प्रसिद्ध झाले होते. यासोबत प्रत्येकाला आता या चित्रपटाच्या सीक्वेलची उत्सुकता लागून राहिली आहे. तर आता असे सांगितले जात आहे कि चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची शुटींग लवकरच सुरु होणार आहे.

नुकतेच चित्रपटाची शुटींग सुरु करण्यासाठी एक पूजा देखील केली गेली होती. ज्याचे फोटो सोशल मिडियावर पाहायला मिळाले होते. पहिल्या पार्टचे नाव पुष्पा द राइज होते तर दुसऱ्या पार्टचे नाव पुष्पा द रूल असेल. इंस्टाग्रामवरील एका पेजवरून याची माहिती दिली गेली आहे कि हा चित्रपट पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये रिलीज होणार आहे. आता जिथे चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता लागून राहिली आहे तर दुसऱ्या पार्टच्या स्टार कास्टबद्दल देखील अनेक प्रकारची माहिती समोर येत आहे.

इंस्टाग्रामवरील एका पेजने सांगितले आहे कि अल्लू अर्जुन या चित्रपटासाठी १२५ करोड रुपये फीस घेत आहे. तर सुकुमार यासाठी ५० करोड आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना ५ करोड रुपये घेत आहे. जानेवारीमध्ये जगभरामधील स्क्रीनवर हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे. सोशल मिडियावर चाहते देखील या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. बहुतेक चाहते म्हणत आहेत कि ते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

माहितीनुसार सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये अल्लू अर्जुन पुष्पा २ ची शुटींग सुरु करू शकतो. असे म्हंटले जात आहे कि काही काळानंतर रश्मिका मंदानादेखील चित्रपटाच्या शुटींगमध्ये सामील होऊ शकते. पुष्पा द राइज २१ डिसेम्बर २०२१ रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या तेलुगु व्हर्जनने चांगलीच खळबळ उडवली होती. त्याचबरोबर हिंदीमध्ये देखील दर्शकांनी या चित्रपटाला खूप पसंती दिली.

Leave a Comment