आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ६ नोव्हेंबर रोजी एका मुलीचे आईवडील झाले आहेत. आज सकाळी दोघे आपल्या मुलीला घरी घेऊन जाण्यासाठी पोहोचले. अशामध्ये रणबीरची गाडी पाहताच पॅप्सनी त्याला घेरले आणि त्याच्या मुलीचे फोटो घेऊ लागले. एकामागून एक सोशल मिडियावर आता अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता कि आलिया भट्ट ब्लॅक ड्रेसमध्ये बसली आहे तर रणबीर आपल्या मुलीला घेऊन सर्वांपासून तिला लपवत आहे. अशामध्ये पॅप्स रणबीरच्या मुलाचा फोटो घेण्यासाठी धक्काबुक्की करू लागले.
सोशल मिडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे ज्यामध्ये पॅप्स रणबीर-आलियाच्या गाडीच्या समोर उभे आहेत आणि फोटो घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ते गाडीला पुढेच जाऊ देत नाहीत. अशामध्ये स्टार्सचे काही गार्ड्स तिथे पोहोचले आणि गर्दीला गाडीसमोरून हटवू लागले.
जसे बॉडीगार्ड एक लाल टी-शर्ट घातलेल्या व्यक्तीला रणबीर-आलियाच्या कारसमोर हटवले तसे त्याला राग आला. रागामध्ये तो व्यक्ती गार्डला म्हणते कि, तू कशाला पकडत आहेस. हे म्हणताना त्याचा चेहरा पाहण्यासारखा होता. आता सोशल मिडियावर लोक या व्हिडीओवर अनेक प्रकारच्या कमेंट्स करत आहेत.
सोशल मिडियावर अनेक लोक या व्हिडीओला पाहून पॅप्सवर आपला राग व्यक्त करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले आहे कि, त्यांना प्रायव्हसी द्या, तुम्ही जबरदस्ती का करत आहात. याशिवाय दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि, तुम्ही लोक वेडे झाला आहात का. आपली इज्जत तर सांभाळा.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने या वर्षी एप्रिलमध्ये लग्न केले होते. यानंतर दोन महिन्यांमध्येच कपलने प्रेग्नंसीची घोषणा केली होती. असो आलिया आणि रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आलिया करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटामध्ये रणवीर सिंहसोबत दिसणार आहे, तर रणबीर लवकरच संदीप वांगाच्या एनिमल चित्रपटामध्ये दिसणार आहे.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.