बॉलीवूड इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने नुकतेच अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न केले आहे. लग्नानंतर दोघे नेहमीच चर्चेमध्ये असतात. दोघांनी आता आईवडील होणार असल्याची घोषणा करून चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. आता यादरम्यान आलिया भट्ट प्रसिद्ध फिल्म मेकर करण जौहरचा कॉफी विथ करणच्या ७ व्या सीजन मध्ये पोहोचली होती. जिथे तिने आपल्या पर्सनल आयुष्याविषयी अनेक खुलासे केले.

या दरम्यान आलिया भट्टला सुहागरात्री संबंधी प्रश्न देखील विचारला गेला. ज्याचे उत्तर देताना तिने प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडले. चला तर जाणून घेऊया आलिया भट्टने असे काय म्हंटले आणि या टॉपिकवर इतर लोकांचे काय मत आहे.

लग्नानंतर सुहागरात्र किती जरुरीची आहे

जेव्हा आलिया भट्टला सुहागरात्रीबद्दल प्रश्न विचारला तेव्हा तिने याचे उत्तर देताना म्हणाली कि सुहागरात्री सारखे काहीच नसते कारण तुम्ही खूप थकलेले असता. वास्तविक ज्या लोकांचे लग्न झालेले असते त्यांच्यासाठी सुहागरात्र खूपच महत्वाची असते. पण दिवसभराच्या थकव्यानंतर एक कपलसाठी इतके देखील जरुरीचे नसते कि जितके यासाठी चर्चा केली जाते.

अनेक लोक असे असतात जे सुहागरात्रीला इंटिमेट होत नाहीत कारण त्यांच्यामध्ये इतकी उर्जा राहिलेली नसते. ते आधीच लग्नासंबंधी विधी आणि कामांमध्ये थकून जातात. अशामध्ये सुहागरात्रीसाठी स्पेशल दिवस काढला पाहिजे. यावर अनेक लोकांकडून मत देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला जो अशाप्रकारे आहे.

एकाने म्हंटले कि जेव्हा माझी सुहागरात्र होती तेव्हा मी थकव्यामुळे बेडवर झोपले होते. माझ्या पतीने थोडा वेळ माझ्याकडे पाहिले आणि नंतर जोराने हसू लागला. मी देखील त्याला झोपण्यासाठी सांगितले आणि एकत्र एक अविस्मरणीय रात्र घालवली आणि एकमेकांच्या मिठीमध्ये झोपून गेलो.

तर एकाने आपले मत व्यक्त करताना सांगितले कि लग्नाच्या पूर्ण दिवसामधील विधींनंतर मी आणि माझी पत्नी थकलो होतो. आमच्यामध्ये सेक्स करण्यासाठी जरादेखील उर्जा शिल्लक राहिली नव्हती. तथापि आम्ही दोघांनी निर्णय घेतला कि काही झाले तर आम्ही एकदा ट्राय जरूर करणार, कारण याला पूर्ण करणे आमचे लक्ष होते. पण हे खूपच मूर्खपणाचे होते आम्ही प्रयत्न देखील केला आणि खूप हसलो.

एकाने म्हंटले कि मी आलियाशी सहमत आहे. तिचे तर तिच्या कुटुंबियांसोबत प्राइव्हेट वेडिंग होते. जरा त्या लोकांबद्दल विचार करा जे कपल्स बिग इंडियन वेडिंग करतात, जिथे ते तासनतास आपल्या गेस्टला ग्रीट करत राहतात. हे खूपच थकाऊ काम आहे आणि यानंतर सुहागरात्रीसाठी जरादेखील उर्जा शिल्लक राहत नाही. याशिवाय इतर लोकांनी देखील आपले मत व्यक्त केले.

आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ब्रम्हास्त्र चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय नुकतेच आलिया भट्टने हार्ट ऑफ स्टोन या हॉलीवूड चित्रपटाची शुटींग पूर्ण केली आहे. याशिवाय तिच्याकडे जी ले जरा आणि रॉकी एंड रानी की प्रेम कहानी हे चित्रपट देखील आहेत.