अभिनेत्री आलिया भट्टने अभिनेता रणबीर कपूरसोबत १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न केले होते आणि ६ नोव्हेंबर २०२२ रोजी अभिनेत्रीने मुलगी राहा कपूरला जन्म दिला होता. डिलिव्हरीच्या काही दिवसांनंतर आलियाने योग आणि एक्सर्साइज देखील सुरु केली होती.
आलिया आपल्या स्कीनची देखील विशेष काळजी घेते. आता आलियाच्या जिम ट्रेनरने अभिनेत्रीचा एक लेटेस्ट व्हिडीओ शेयर केला आहे ज्याने सर्वांना चकित केले आहे. आलियाची मेहनत तर चाहते पसंद करतच आहेत पण त्याचबरोबर तिच्या डेडिकेशनचे देखील विशेष कौतुक करत आहेत. चला तर पाहूया आलिया आपली फिगर मेंटेन करण्यासाठी कोणत्या प्रकारची एक्सर्साइज करत आहे.
सेलिब्रिटी जिम ट्रेनर यास्मिन कराचीवालाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर आलियाची एक क्लिप शेयर केली आहे. या क्लिपमध्ये अभिनेत्री पिलाटेस करताना पाहायला मिळत आहे. पिवळ्या टी-शर्ट आणि काळ्या जिम पॅन्टमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्याचा ग्लो खूपच सुंदर आहे आणि तिची या ग्लोला आणखीनच वाढवत आहे.
रणबीर कपूरची पत्नी आणि राहा कपूरची आई अभिनेत्री आलियाचा हा एक्सर्साइज व्हिडीओ खूपच वेगाने सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ यास्मिनच्या स्टोरीपासून अनेक मिडिया पेजेस वर देखल शेयर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने एक नो-मेकअप सेल्फी शेयर केला होता. ज्यामध्ये त्यांनी दाखवले होते कि ती स्किनकेयर कशी करते. आलिया आई झाल्यानंतर आपल्या स्कीन आणि बोडीची विशेष काळी घेते आणि लवकरच ती कामावर परतणार आहे.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.