Animal Box Collection Day 1: एनिमल चित्रपट सर्वात पहिला अमेरिकामध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाची क्रेज संपूर्ण जगामध्ये पाहायला मिळत आहे. अमेरिकामध्ये रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या या चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. एनिमलने आपल्या पहिल्या शोमध्येच जबरदस्त कमाई केली आहे. ताज्या अहवालानुसार अमेरिकामध्ये एनिमलचे 1154 शोज आहेत. ज्यामध्ये आतापर्यंत चित्रपटाने 5.40 करोडची कमाई केली आहे. चित्रपटाने आपल्या पहिल्याच शोमध्ये एक मिलियनपेक्षा जास्त कमाई केली आहे.
Animal Box Collection Day 1
बातमीनुसार एनिमल चित्रपटाने अमेरिकेमधील सलमान खानच्या टायगर ३ चित्रपटाचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. सलमान खानच्या चित्रपटाने एका दिवसामध्ये 1.70 करोड रुपयांच्या कमाई केली होती तर एनिमलची (Animal Box Collection Day 1) कमाई 5.40 करोड इतकी झाली आहे. तर भारतामध्ये एनिमलच्या अॅडव्हान्स बुकिंगबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट रणबीर कपूरच्या करियरमधील सर्वात मोठी ओपनिंग करणारा चित्रपट बनणार आहे.
असे सांगितले जात आहे कि एक दिवस अगोदर देखील एनिमलची अॅडव्हान्स जबरदस्त पाहायला मिळणार आहे. असा अंदाज लावला जात आहे कि हा चित्रपट ३५ ते ४५ करोड रुपयांपर्यंत ओपनिंग करू शकतो. तथापि हे अजून अंदाजी आकडे आहेत. योग्य आकडे हे चित्रपट रिलीज झाल्यानंतरच समोर येतील.
सेंसर बोर्डकडून Animal चित्रपटाला ‘A’ सर्टिफिकेट
सेंसर बोर्डकडून एनिमल (Animal) चित्रपटाला ‘A’ सर्टिफिकेट मिळाले आहे. एनिमल चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. ज्यांनी कबीर सिंह आणि अर्जुन रेड्डी सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. रणबीर कपूरचा एनिमल संबंधित लुक जेव्हा व्हायरल झाला होता तेव्हा ते खूपच चर्चेमध्ये आले होते. हा चित्रपट १ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. एनिमलसोबत विक्की कौशलचा सॅम बहादूर चित्रपट देखील रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे.