शिवकाळात लाईट कसे…? या प्रश्नावर महेश मांजरेकरांनी दिले असे उत्तर…

By Viraltm Team

Published on:

अभिनेता अक्षय कुमारसाठी हे वर्ष इतके चांगले राहिले नाही, त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकले नाहीत. अक्षय कुमारने नुकतेच पृथ्वीराज चित्रपटामध्ये भूमिका केली होती आणि आता तो वेडात मराठे वीर दौड़ले सात या मराठी चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार आहे. नुकतेच अक्षय कुमारने या चित्रपटामधील आपला लुकचा टीझर शेअर केला आहे.

इंस्टाग्रामवर टीझर शेयर करत अक्षय कुमारने जय भवानी, जय शिवाजी असे लिहिले होते. पण अक्षयने हा टीझर शेयर करताच त्याला लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली. वेडात मराठे वीर दौड़ले सात चित्रपटामधून मराठी चित्रपटांमध्ये डेब्यू करत असेलेल्या अक्षयसाठी त्याचे चाहते उत्साहित होते पण टीझर समोर येताच्य चाहत्यांचा हिरमोड झाला, कारण टीझरमध्ये एक नाही अनेक चुका समोर आल्या.

सर्वात पहिला व्हिडीओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये अक्षयचा लुक आणि चाल चाहत्यांना खास पसंद आली नाही आणि त्यानंतर व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या झुंबराने चाहत्यांची निराशा केली. वास्तविक झुंबरमध्ये इलेक्ट्रिक बल्ब दिसत होते युजर्सचे म्हणणे आहे कि अक्षय कुमार आणि चित्रपटाच्या टीमने थोडी रिसर्च करायला हवी होती, कारण शिवाजी महाराजांनी १६७४ पासून ते १६८० पर्यंत राज्य केले होते, तर थॉमस एडिसनने इलेक्ट्रिक बल्बचा शोध १८८० मध्ये लावला होता.

फक्त बल्बच नाही तर वयामुळे देखील अक्षय कुमारला ट्रोल व्हावे लागले. शिवाजी महाराजांचे निधन ५० व्या वर्षी झाले होते, तर अक्षय कुमार जो त्यांची भूमिका करत आहे, त्याचे वय ५५ वर्षे आहे. लोकांचे म्हणणे आहे कि मेकर्सने एखाद्या मराठी अभिनेत्याला कास्ट का केले नाही ज्याची मराठी आणि अभिनय उत्कृष्ट आहे, जो पडद्यावर शिवाजी महाराजांच्या भूमिकेला अधिक चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकेल.

दरम्यान चित्रपटाच्या टीझरमध्ये झुबरमध्ये इलेक्ट्रिक लाईट कशा, याबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकरांशी संवाद साधण्यात आला, त्यावर ते म्हणाले कि तो सेटवरचा लाईट असू शकतो. सेटवर लाईट नसतात का. मात्र जर आहा लाईट सेटवरचा असेल तर आणि तो फ्रेममध्ये येणार नसेल तर त्यासाठी इतकी सजावट का, या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत राहिले.

अक्षय कुमारचा हा चित्रपट २०२३ मध्ये दिवाळीला रिलीज होणार आहे. हा चित्रपट मराठीशिवाय हिंदी, तमिळ आणि तेलगुमध्ये देखील रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकरने केले आहे. चित्रपटामध्ये अक्षय कुमारशिवाय नवाब खान, उत्कर्ष शिंदे, हार्दिक जोशी, सत्रया आणि जय दुधने देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत.

Leave a Comment