अक्षय कुमार आपल्या आगामी लक्ष्मी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कियारा अडवाणीसमवेत कपिल शर्मा शोमध्ये पोहोचला होता. यादरम्यान प्रत्येकाने खूप मजा मस्ती केली. अर्चना पूरनसिंगने अक्षयला विचारले की घरी सुद्धा तू राजा सारखी लाईफ जगतोस का? त्यावर अक्षय कुमार म्हणाला की नाही, मी राजा सारखे अजिबात जगत नाही. मग अर्चनाने विचारळे, तुझे आणि ट्विंकलचे कधी भांडण झाल्यावर त्यात कोण जिंकते?
अक्षय लगेच म्हणाला ट्विंकल नेहमी जिंकते. मग अर्चनाने पुन्हा विचारले की तुला कधी कळले की आपण कधीच जिंकू शकत नाही? यावर उत्तर देताना अक्षय म्हणाला की लग्नाच्या पहिल्याच रात्री हा खुलासा झाला होता. अक्षय कुमार म्हणाला आमच्या लग्नाची पहिली रात्र साजरी झाल्यावरच मला कळाले की ट्विंकल बरोबर मी कधीही जिंकू शकत नाही, सर्व गोष्टीवर तिचीच मर्जी चालते हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले.

अक्षय २५ वेळा कपिल शर्मा शोमध्ये आला आहे, या कार्यक्रमात अक्षय कुमारचे रौप्यमहोत्सव आगमन असल्याने टीमच्या सर्व सदस्यांनी त्याला गिफ्ट दिले. कपिल शर्मा आणि त्याच्या टीमने अक्षय कुमारला नोट मोजणारी मशीन गिफ्ट म्हणून दिली. यावेळी अक्षय कुमारने कपिल शर्माची चेष्टा मस्करी देखील केली. तो म्हणाला की कपिलने आणलेले हे नोट मोजण्याचे मशीन स्वत:च्या घरातून आणले आहे. या शो मधील अर्ध्या पैशाचा वाटा त्याच्याकडे आहे. हे ऐकून दर्शक मोठ्याने हसू लागले.
भारतीने अक्षयला क्रॉकरी गिफ्ट दिली. तर कृष्णा अभिषेक अलार्म क्लॉक आणि किकू शारदाने ताजमहालची प्रतीकृती अक्षयला गिफ्ट म्हणून दिली. आपल्याला माहिती असेल की अक्षय कुमारचा लक्ष्मी हा चित्रपट ९ नोव्हेंबरला डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राघव लॉरेन्स यांने केले असून तमिळ भाषेमधील कंचना या चित्रपटाचा हा रिमेक आहे.
या चित्रपटात अक्षय कुमार पहिल्यांदाच एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार आहे. भारतामध्ये ट्रान्सजेंडर समुदायाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अक्षय आपल्या चित्रपटातून ट्रान्सजेंडर समुदायाच्या संवेदना पडद्यावर मांडणार आहे. ट्रांसजेंडर एक्टिविस्ट लक्ष्मी शुक्ला यांनी लक्ष्मी चित्रपटा ट्रेलर पाहून आनंद व्यक्त केला आहे.