बॉलीवूड ‘हा’द र’ले’ ! अभिनेता अक्षय कुमारच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे ‘नि धन’, भावूक पोस्ट शेयर करत दिली माहिती…

By Viraltm Team

Published on:

अक्षय कुमारचा हेयर स्टाइलिस्ट मिलन जाधव उर्फ मिलानोचे निधन झाले आहे. मिलानो गेल्या १५ वर्षापासून अक्षय कुमारसोबत काम करत आहे. त्याच्या निधनाच्या बातमीने अभिनेत्याला मोठा धक्का बसला आहे. अक्षयने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेयर करून मिलन जाधवच्या निधनाची माहिती दिली आहे.

अक्षय कुमारने पोस्टमध्ये मिलन जाधवला श्रद्धांजलि देताना लिहिले आहे कि, तू तुझ्या फंकी हेयर स्टाइल आणि हास्यासोबत गर्दीमध्ये वेगळा होतास. तू नेहमी काळजी घेतली कि माझा केसाला जरादेखील इजा होणार नाही. सेटवरचे जीवन, माझ्या हेयर स्टाइलिस्ट १५ वर्षापेक्षा अधिक काळापासून मिलन जाधव. अजून देखील विश्वास बसत नाही आहे कि तू आम्हाला सोडून गेलास. मला तुझी नेहमी आठवण येईल ओम शांति.

मिलन जाधवला फिल्म इंडस्ट्रीमध्ये मिलानो नावाने ओळखले जात होते. अक्षय कुमारशिवाय तो इतर अनेक सेलिब्रिटींचा देखील हेअरस्टाइलिस्ट होता. सोशल मिडियावर करीना कपूर आणि कियारा अडवाणीसोबत देखील त्याचे फोटो पाहायला मिळतात.

१५ वर्षापासून अक्षय कुमारसोबत मिलानो काम करत होता. अक्षयने आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे कि तो नेहमी सेटवर या गोष्टीची काळजी घायचा कि अक्षयच्या केसाला इजा होऊ नये. मिलानोचे काम अक्षय कुमारसोबत अनेक कलाकारांना खूप पसंद येत होते.

मिलानोच्या निधनाचे कारण अजून देखील समोर आलेले नाही. पण अक्षय कुमार त्याच्या जाण्याने खूप दुखी आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अक्षय कुमारचा कठपुतली चित्रपट ओटीटीवर चांगले प्रदर्शन करत आहे. त्याचे अपकमिंग चित्रपट रामसेतु, योद्धा आणि ओ माय गॉड आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

Leave a Comment