अक्षय कुमारने हि ‘अट’ ठेवली नसती तर आज ट्विंकलच्या ठिकाणी ‘हि’ अभिनेत्री त्याची बायको म्हणून मिरवत असती…!

By Viraltm Team

Updated on:

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाच्या लग्नाला १९ वर्षे झाली आहेत. या कपलला बॉलीवूडमधील पॉवर कपल म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर दोघांची केमेस्ट्री देखील खूपच चांगली आहे. अप्रतिम सेंस ऑफ ह्यूमर असणारी ट्विंकल नेहमी अक्षय कुमारची बोलती बंद करताना पाहायला मिळते.

अक्षयच्या घरी फक्त आणि फक्त ट्विंकलचीच चलती असते. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर लोकांच्या तोंडामधून ‘जोडी हो तो ऐसी’ हेच शब्द बाहेर पडतात. खिलाडी अक्षय कुमारला भलेही लग्नानंतर जोरू का गुलाम म्हणत असतील पण एक काळ असा होता जेव्हा इंडस्ट्रीमध्ये अक्षयच्या अफेयरचे किस्से खूपच चर्चेमध्ये असते.

अक्षयच्या नावासोबत त्याच्यासोबत काम करणाऱ्या अनेक अभिनेत्रींचे नाव जोडले गेले. पण रविना टंडन आणि शिल्पा शेट्टीसोबत त्याची प्रेम कहाणी बॉलीवूडमधील सर्वात चर्चित स्टोरीजपैकी एक राहिली आहे. रविनाचे हृदय शिल्पासाठी तर शिल्पाचे हृदय अक्षयने ट्विंकलसाठी तोडले होते.

असे म्हंटले जाते कि अक्षय आपल्या गर्लफ्रेंडसमोर एक विचित्र अट ठेवत असे. शिल्पाने ती अट मानण्यास नकार दिला तर ट्विंकलने ती अट मान्य केली. तेव्हा शिल्पाला धोका देऊन अक्षयने ट्विंकलसोबत लग्न केले.

मैं खिलाड़ी तू अनाड़ी चित्रपटादरम्यान अक्षय आणि शिल्पा शेट्टीची भेट झाली होती. या दरम्यान दोघांना एकमेकांची साथ खूप पसंत येऊ लागली होती. जानवरच्या शुटींग दरम्यान दोघांमध्ये खूप जवळीक वाढली होती. अक्षय शिल्पाच्या आयुष्यामध्ये येणारा पहिला व्यक्ती होता.

दोघांचे एकमेकांवर इतके प्रेम होते कि ते लोकांच्या नजरेमध्ये आल्याशिवाय राहिले नाही. दोघांच्या लव्ह स्टोरीचे किस्से बॉलीवूडमध्ये खूपच चर्चेचा विषय ठरले होते. दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केले. रविना प्रमाणे शिल्पा शेट्टी देखील अक्षयसोबत लग्नाचे स्वप्न पाहत होती.

दोघांच्या एंगेजमेंटच्या चर्चा देखील खूप मोठ्या प्रमाणात होत होत्या. पण यादरम्यान अक्षय आणि शिल्पाच्या लव्ह अँगलमध्ये ट्विंकल खन्नाचे नाव देखील जोडले गेले होते. असे म्हंटले जाते कि अक्षय शिल्पा शेट्टी आणि ट्विंकल दोघींना देखील एकाच वेळी डेट करत होता. शिल्पा शेट्टीच्या पाठीमागे अक्षयने ट्विंकल खन्नासोबत देखील आपली जवळीक वाढवली होती. जेव्हा हि गोष्ट शिल्पाला माहित झाली तेव्हा तिने मोठा हंगामा केला होता.

पण नंतर अक्षयने शिल्पा शेट्टीसोबत ब्रेकअप करून ट्विंकल सोबत लग्न केले होते. शिल्पा शेट्टीला प्रेमात असा धोका मिळाला कि ती यामधून लवकर सावरली नाही. यानंतर शिल्पाने अक्षयविरुद्ध अनेक वेळा विधाने केली होती आणि मोठा हंगामा केला होता. बराच काळ शिल्पाने अक्षयचे तोंड देखील पाहिले नव्हते.

असे म्हंटले जाते कि अक्षयने लग्नासाठी शिल्पासमोर एक अट ठेवली होती कि लग्नानंतर शिल्पाला आपले बॉलीवूड करियर संपवावे लागेल आणि घराची जबाबदारी स्वीकारावी लागेल. शिल्पाला अक्षयची हि अट मंजूर नव्हती तर ट्विंकलने अक्षयची हि अट मान्य केली होती. ट्विंकलने अक्षयच्या प्रेमासाठी आणि आपल्या लग्नासाठी बॉलीवूड करियर सोडण्याचा निर्णय घेतला आणि अक्षयने देखील आपले लग्न करून आपले वचन पूर्ण केले. आता अक्षयला बॉलीवूडमधील जोरू का गुलाम म्हणून ओळखले जाते.

Leave a Comment