अभिनेत्री काजोल बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. इतकेच नाही तर काजोल आणि अजय देवगणची जोडी बॉलीवूडमध्ये बेस्ट जोडींपैकी एक आहे. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम देखील केले आहे. पण एकदा अशी वेळ आली होती कि काजोल आणि अजय देवगन यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले होते.

काजोल आणि अजय देवगन यांच्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री झाली होती होती. ज्यामुळे त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. यामुळे काजोलने अजयला धमकी अक्षरशः धमकी दिली होती. पण काजोलने वेळीच सर्व गोष्टी हाताळत आपला संसार सांभाळला होता.

अजय देवगन आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्यामध्ये जवळीक वाढल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु होत्या. अजय आणि कंगना वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई चित्रपटामध्ये एकत्र दिसले होते. शुटींग दरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली होती. दोघांच्या अफेयरच्या चर्चा देखील मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. यामुळे अजय आणि काजोल यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये वादळ निर्माण झाले होते.

ज्यावेळी काजोलला हे सर्व समजले होते तेव्हा तिने यावरून अजयला चांगलेच सुनावले होते. घर सोडून जाण्याची धमकी देखील दिली होती. एका मुलाखतीदरम्यान अजयने अफेयरबद्दल वक्तव्य केलं होतं. ज्यामध्ये तो म्हणाला होता कि, मी अस म्हणत नाही कि विवाहानंतर अफेयर्स होत नाहीत. पण कधी कधी मिडियावाले लोकांना एकत्र पाहिल्यानंतर चुकीचा अर्थ लावतात.

१९९५ मध्ये हलचल चित्रपटाच्या शुटींगदरम्यान काजोल आणि अजय एकत्र आले होते. यानंतर दोघांनी एकमेकांना चार वर्षे डेट केल्यानंतर लग्न केले. काजोलच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता पण नंतर ते तयार झाले. १९९९ मध्ये दोघांनी लग्न केले. अतिशय खासगी पद्धतीने त्यांनी लग्न केले होते.