नोएडा पोलिसांनी फसवणुकीच्या एका धक्कादायक प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी आरोपींकडून बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय हिचा बनावट पासपोर्ट जप्त केला आहे. ही फसवणूक नायजेरियन टोळीकडून केली जात होती, ज्याच्या तीन सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस उपायुक्त (झोन 3) अभिषेक वर्मा म्हणाले कि नोएडा पोलिस आणि ग्रेनो सायबर सेलने ग्रेटर नोएडा येथून तीन नायजेरियन नागरिक ईक उफेरेमुकेवे, एडविन कॉलिंस आणि ओकोलोई डेमियन यांना अटक केली आहे.
नोएडाच्या थाना बीटा-२ पोलीस आणि सायबर सेलने औषध कंपनीच्या नावाने फसवणूक करणाऱ्या नायजेरियन टोळीच्या तीन सदस्यांना अटक केली आहे. आरोप हा आहे कि त्यांनी एका सेवानिवृत्त कर्नलची जवळ जवळ एक करोड ८० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी या टोळीकडून बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा बनावट पासपोर्टही जप्त केला आहे.
पोलिसांच्या तपासात हे समोर आले आहे कि ऐश्वर्या रायचा नकली पासपोर्ट ते कशासाठी वापरत असत. टोळीतील सदस्य कंपनीचे प्रतिनिधी बनून जास्त किमतीमध्ये औषधी वनस्पती खरेदी करण्याचे आश्वासन देत असत. याशिवाय हि टोळी विवाह संबंधी वेबसाईट आणि डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून लोकांना टार्गेट करत होती.
पोलिसांना माहिती मिळाली होती कि हि टोळी अॅवबॉट फार्मास्युटिकल्स’ कंपनीसह अन्य कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करत होती. त्यांनी एका सेवानिवृत्त कर्नलला ब्रे स्ट कॅन्सरवर औषध बनवण्यासाठी कोलानाट विकत घेण्याची फसवणूक केली.
यानंतर एक करोड ८० लाख रुपयांची फसवणूक केली होती. तपासादरम्यान माहिती झाले कि या टोळीने विवाह संबंधी वेबसाईट आणि डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून अनेक लोकांची फसवणूक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे व्हिसा आणि पासपोर्टही नव्हता.