ऐश्वर्या रायला तिचा पती अभिषेक बच्चनची हि हरकत खूपच पसंद आहे. ती नेहमी आपले प्रेम मनापासून समर्पित करते. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे बॉलीवूडमधील सर्वात चर्चित कपल्सपैकी एक आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन एकमेकांवर खूप प्रेम करतात.
नेहमी हे कपल एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करताना पाहायला मिळत असते. पण तुम्हाला महिती आहे का कि अभिषेक बच्चनच्या क्वालिटीमुळे ऐश्वर्या रायने त्याला आपला जोडीदार म्हणून निवडला आहे. अभिषेकच्या या गुणाचे ऐश्वर्या नेहमीच कौतुक करत असते.
धूम २ चित्रपटाच्या शुटींगदरम्यान ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये जवळीक वाढली होती. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले आणि अभिषेक आणि ऐश्वर्या गुरु चित्रपटामध्ये देखील एकत्र पाहायला मिळाले होते. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २००७ मध्ये लग्न केले.
ऐश्वर्या रायने आपल्या एका मुलाखतीमध्ये म्हंटले होते कि अभिषेक एक खूपच सभ्य आणि उदार व्यक्ती आहे आणि चमकदार कवच असलेला शूरवीर यांचे मिश्रण आहे आणि मला त्याचे हे गुण खूप आवडतात. तो इतर मुलांप्रमाणे वेडा आणि स्ट्रीक्ट नाही.
मी अशा व्यक्तीसोबत नाही राहू शकत जो नेहमी आपल्या शारीरिक स्थितीबद्दल नेहमी चिंतिती राहतो आणि अभिषेक असा नाही. इतकेच नाही तर मुलाखतीदरम्यान ऐश्वर्याने आपल्या सफल लग्नाबद्दल द्केहील सांगितले होते. ती म्हणाली होती याचे मुख्य कारण अभिषेक बच्चन आहे.
अभिनेत्रीने म्हंटले होते कि दोन लोकांचा विश्वास नात्यामध्ये खूप महत्वाचा असतो. तिने म्हंटले कि आम्ही एकमेकांसोबत काय करतो. ऐश्वर्याने म्हंटले होते कि आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवा. आपल्या हृदय, मन आणि आत्म्यावर विश्वास ठेवा. तू खूपच चांगला मित्र आहेस. सर्व काही वास्तविक रूपाने अनुभव करा. असे केल्याने तुमचे वैवाहिक आयुष्य नेहमी चांगले राहील.
अभिषेक बच्चन अनेकप्रसंगी आपल्या सुंदर पत्नीची साथ देताना पाहायला मिळतो. अभिनेत्याने लग्नानंतर एक मुलाखती दिली, ज्यामध्ये त्याने ऐश्वर्या रायसोबत लग्न केल्यानंतर जीवनामध्ये आलेल्या बदलाबद्दल सांगितले, त्याने म्हंटले कि मी माझ्या घरातील प्रिय आहे. माझ्यावर कोणतीच जबाबदारी नाही, पण जेव्हा ऐश्वर्या माझ्या आयुष्यामध्ये आली तेव्हा मला माझ्या जबाबदारीची जाणीव झाली.