अभिनेत्री ऐश्वर्या जरी चित्रपटांपासून दूर असली तरी तिची जादू अजूनदेखील कमी झालेली नाही. आता ती आपल्या कुटुंबामध्ये व्यस्त आहे. ऐश्वर्याचे नाव ऐकताच डोळ्यांसमोर स्वप्नसुंदरीचा चेहरा येतो जिने एकेकाळी जगाला अक्षरशः वेड लावले होते.
ऐश्वर्या राय आजदेखील तितकीच चर्चेमध्ये असते जितकी ती आधी होती. कारण ज्यापद्धतीने तिने स्वतःला मेंटेन ठेवले आहे ते पाहता अजून तिचे वय वाढलेलेच नाही असे भासते. एक काळ असा होता जेव्हा ऐश्वर्यासाठी तरुण वेडे होत असत. आज आपण तिचा असा लुक पाहणार आहोत जो पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल खरेच तिचा विश्वसुंदरीचा किताब अजून देखील अबाधित आहे.
हा किस्सा १९९४ मधला आहे. १९ नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या सनसिटीमध्ये आयोजित मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये ऐश्वर्या रायला विजेता म्हणून घोषित करण्यात आले होते. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी ती विश्वसुंदरी बनली होती आणि कोणालाही त्याचे काहीच आश्चर्य वाटले नाही.
कारण स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच ती या किताबाचा प्रबळ दावेदार होती. याआधी तिने मिस इंडिया स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले होते आणि त्यामुळे तिला सर्वात जास्त पसंती मिळाली होती. ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा किताब जिंकला पण तिच्यासाठी हे वाटते तितके सोपे नव्हते.
जगभरामधून ४० सौंदर्यवतींसोबत तिची स्पर्धा होती. पण ऐश्वर्याच्या लुकमुळे सर्वात जास्त तिलाच पसंती मिळाली. पण यामध्ये एक गोष्ट आहे जी खूपच कमी लोकांना माहिती आहे. मिस वर्ल्डच्या किताबावर आपले नाव कोरण्यापूर्वी विनिंग राउंडमध्ये बि कि नी घालून रॅम्पवर उतरायचे होते. यादरम्यान ऐश्वर्याचा लुक इतका सुंदर दिसत होता कि सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या.
या राऊंडमध्ये सर्व स्पर्धकांनी एकाच रंगाचा सूट परिधान केला होता पण त्यामधून देखील ऐश्वर्याचा लुक सर्वांपेक्षा हटके दिसत होता. याचा कलर हिरवा होता आणि त्यामध्ये ऐश्वर्याची कर्वी फिगर जबरदस्त फ्लॉन्ट होत होती. अशामध्ये ऐश्वर्याची कातील स्माईलने सर्वजण घायाळ झाले होते. जेव्हा ऐश्वर्या रॅम्प वर उतरली तेव्हा तिचा जबरदस्त कॉन्फीडन्स पाहून जज देखील भारावून गेले होते. एक विशेष बाब म्हणजे ऐश्वर्याच्या स्मित हास्याने सर्वांचेच हृदय जिंकले होते.