दिशा पटानी नाही तर बॉलीवूडची ‘हि’ दिग्गज अभिनेत्री आहे आदित्य ठाकरेंवर फिदा, आदित्य ठाकरेंच्या फोटोवर कमेंट करून…

By Viraltm Team

Published on:

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष सध्या महाराष्ट्राच्या राजकारणावर आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रामधील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.

महाराष्ट्रामधील अनेक राजकीय हालचालींनी सध्या वेग घेतला आहे. २०१९ मध्ये सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आदित्य ठाकरे यांनी पर्यटन व पर्यावरण खात्याची जबाबदारी सांभाळली होती. ते नेहमी सोशल मिडियाच्या माधमातून लोकांना माहिती देत असत.

सध्या आदित्य ठाकरे यांची एक पोस्ट चांगलीच चर्चेमध्ये आली आहे आणि या पोस्टचे व्हायरल होण्यामागचे कारण देखील तितकेच खास आहे. आदित्य ठाकरे यांच्या फोटोवर एका अभिनेत्रीने कमेंट केल्यामुळे ती चांगलीच चर्चेमध्ये आली आहे. विशेष म्हणजे ती अभिनेत्री दिशा पटानी नाही तर दुसरीच आहे.

आदित्य ठाकरे यांनी वडील उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा एक व्हिडीओ इंस्टाग्राम पेजवरून शेयर केला आहे. यामध्ये त्यांनी कॅप्शन देत लिहिले आहे कि, नेहमी योग्य व्यक्तीचा आदर्श घेणे खूपच महत्वाचे असते. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आणि आशीर्वादासाठी मी नेहमी तुमचा ऋणी राहीन. तुमचे प्रेम हीच आमची खरी ताकद आहे.

आदित्य ठाकरे यांनी शेयर केलेल्या या पोस्टवर सध्या लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे पण एका अभिनेत्रीने केलेली कमेंट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्रीने कमेंट करताना ५ हार्ट इमोजी कमेंटमध्ये टाकल्या आहेत.

हि अभिनेत्री दिशा पटानी असेल असा अंदाज सुरुवातीला सर्वांनी लावला होता. पण ती दिशा पटानी नसून अभिनेत्री अहाना कुमरा आहे. अहाना हि दिग्गज बॉलीवूड अभिनेत्री आहे. बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चनच्या युद्ध या चित्रपटामध्ये तिने काम केले आहे तर शरद केळकरसोबत तिने एजंट राघव-क्राईम ब्रँच या सिरीयलमध्ये काम केले आहे.

Leave a Comment