बिपाशा बसूने नुकतेच आपल्या प्रेग्नंसीचे फोटो शेयर करून चाहत्यांना हैराण केले आहे. अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीच्या बातम्या तर बऱ्याच दिवसांपासून येत होत्या, पण तिने नुकतेच आपले फोटो शेयर करून जगजाहीर केले कि ती प्रेग्नंट आहे आणि या दरम्यान आणखी एका अभिनेत्रीने बेबी बंपचा फोटो शेयर केला आहे.
ज्यानंतर चाहते तिला शुभेच्छा देत आहेत. पण या अभिनेत्रीने आपल्या प्रेग्नंसीचे सत्य देखील सांगितले आहे. जे जाणून घेतल्यानंतर तिचे चाहते उदास झाले आहेत. हि अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून टीव्ही जगतामधील प्रसिद्ध अभिनेत्री अनीता हसनंदानी आहे.
प्रेग्नंसीच्या बातम्यादरम्यान अभिनेत्री अनीता हसनंदानीने देखील एक फोटो शेयर केला आहे. ज्यामध्ये ती पती रोहित रेड्डीसोबत बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. अनीता हसनंदानीचा हा फोटो पाहिल्यानंतर चाहते देखील संभ्रमात पडले आहेत कि अभिनेत्री प्रेग्नंट आहे का नाही ? इतकेच नाही तर अनीता हसनंदानीच्या फोटोवर अनेक प्रश्न देखील विचारले गेले.
अनीता हसनंदानीने पती रोहित रेड्डीसोबत फोटो शेयर करताना सांगितले कि ती प्रेग्नंट नाही, फोटो शेयर करत अभिनेत्रीने लिहिले कि मी प्रेग्नंट नाही. तथापि कॅप्शनमध्ये सांगून देखील चाहते तिला प्रश्न विचारण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. अनेकजण तर तिला शुभेच्छा देखील देऊ लागले. गेल्या दिवसांपासून अभिनेत्रींच्या प्रेग्नंसीच्या बातम्या मोठ्या प्रमाणत येत आहेत, ज्यानंतर तिने या फोटोद्वारे लोकांना आपले उत्तर दिले आहे.
View this post on Instagram
अनीता हसनंदानी आणि रोहित रेड्डीचा हा फोटो अभिनेत्रीच्या पहिल्या प्रेग्नंसी दरम्यानचा आहे, जो तिने इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. तर तिच्या या फोटोवरून चाहत्यांनी असा देखील अंदाज लावला आहे कि तिने अभिनेत्री देबिना बनर्जी आणि गुरमीत चौधरी यांची मस्करी करण्याचा प्रयत्न केला आहे, कारण त्यांनी देखील दुसऱ्या प्रेग्नंसीची घोषणा केली आहे.