बॉलीवूड जगतामधील ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंतसोबत धोका झाला आहे. एकीडे जिथे तिची आई आजारी आहे तर दुसरीकडे तिचे पर्सनल लाईफ धोक्यात आले आहे. एक दिवस अगोदर राखी सावंतने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेयर केले होते. या फोटोंमध्ये राखी तिचा बॉयफ्रेंड आदिल सोबत लग्न करताना दिसली होती. फोटोमध्ये आदिल आणि राखी दोघे गळ्यामध्ये हार घातलेले आणि हाम्ध्ये मॅरिज सर्टिफिकेट घेतलेले दिसत होते. हे फोटो समोर आल्यानंतर सोशल मिडियावर राखी खूपच चर्चेमध्ये आली होती.
राखी सावंतने आपल्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे. राखीने दावा करत म्हंटले आहे कि तिच्या बॉयफ्रेंडसाठी तिने मुस्लीम रिती रिवाजाने लग्न केले पण आता आदिल या लग्नास नकार देत आहे. एका मुलाखतीमध्ये आदिल दुर्रानीवर आरोप लावत तिने म्हंटले कि आदिलने तिला म्हंटले होते कि एक वर्ष आपण आपल्या लग्नाबद्दल कोणाला सांगायचे नाही. तो त्याच्या बहिणीच्या लग्नामुळे असे करत होता. अशामध्ये मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि लग्न ऑफिशियल केले नाही.
यादरम्यान राखी बिग बॉस मराठी सीजन ४ मध्ये आली पण शोमध्ये असताना बाहेर अशा अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या ज्या माझ्या आवाक्याच्या बाहेर होत्या. अशामध्ये मी माझ्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर शेयर करण्याचा विचार केला. तथापि हे फोटो शेयर करताना मी खूप घाबरले होते.
राखीने पुढे म्हंटले कि आता आदिल माझ्याशी लग्न करण्यास नकार देत आहे. माझ्याजवळ लग्नाचे सर्टिफिकेट आहे पण आदिल या लग्नाला नकार देत आहे. आदिलच्या या धोक्यामुळे राखी खूप खचली आहे आणि ती रडत रडत म्हणाली कि माझ्यासोबतच असे का होते.
राखी राखीने एक व्हिडीओ शेयर केला होता. या व्हिडीओमध्ये राखी सावंत हॉस्पीटलमध्ये पाहायला मिळत होती. व्हिडीओमध्ये राखी सांगते कि तिचच्या आईला कॅन्सर आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये आहे. आईची तब्येत अचानक बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
View this post on Instagram