मोठ्या वयाच्या अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली या अभिनेत्रींनी, अनुष्का बनली होती…!

By Viraltm Team

Updated on:

चित्रपटामध्ये वयाने काही फरक पडत नाही. इथे लोकांना त्यांच्या कौशल्यामुळे काम मिळते. हेच कारण आहे कि वयाने मोठ्या अनेक अभिनेत्री आणि अभिनेते छोट्या वयाची भूमिका साकारतात. तर अनेक वेळा छोट्या वयाचे कलाकार वयाने मोठी भूमिका साकारतात. तसे तर भारतीय चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारण्यासाठी ओळखल्या जातात. आज आपण अशाच बॉलीवूड अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या वयाच्या मोठ्या कलाकारांच्या आईची भूमिका साकारली. इतकेच नाही तर त्यांनी आपली हि भूमिका इतक्या उत्कृष्ठरित्या साकारली कि त्यांना आज देखील त्यासाठी ओळखले जाते. चला तर जाणून घेऊया त्या अभिनेत्री कोण आहेत.
नरगिस: १९५७ मध्ये आलेला मदर इंडिया चित्रपट आज देखील भारतामधील ऑल टाईम बेस्ट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटामध्ये नरगिस, सुनील दत्त आणि राजेंद्र कुमारने मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटामध्ये नरगिसने सुनील दत्त आणि राजेंद्र कुमारच्या आईची भूमिका साकारली होती. पण तुम्हाला हे जाणून हैराणी होईल कि तिन्ही कलाकारांच्या वयामध्ये जास्त फरक नव्हता. या तिघांचा जन्म १९२९ मध्ये झाला होता. पण तरीही नरगिसने चित्रपटामध्ये आईची भूमिका साकारून सर्वांनाच चकित केले होते.
राखी गुलजार: १९८२ मध्ये शक्ती हा चित्रपट आला होता. या चित्रपटामध्ये स्मिता पाटिल, दिलीप कुमार, अमरीश पूरी आणि राखी गुलजार हे मुख्य कलाकार होते. या चित्रपटामध्ये राखी गुलजारने अमिताभ बच्चनच्या आईची भूमिका साकारली होती. तर अमिताभ बच्चन राखीपेक्षा ५ वर्षाने मोठे आहेत. तसे राखीला करण अर्जुन चित्रपटामधील तिच्या भूमिकेसाठी आणि डायलॉगसाठी देखील ओळखले जाते.
रीमा लागू: अभिनेत्री रीमा लागू फिल्म इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच काळापासून काम करत आहे. आपल्या बहुतेक चित्रपटांमध्ये तिने आईचीच भूमिका साकारली. रीमा लागूने ३६ व्या वर्षी ऋषी कपूरच्या आईची भूमिका साकारली होती. तर ऋषी कपूर रीमापेक्षा ५ वर्षाने मोठे होते. इतकेच नाही तर रीमाने तिच्या वयाइतक्याच वयाच्या कलाकारांच्या आईची भूमिका देखील साकारली आहे.
शेफाली शाह: अभिनेत्री शेफाली शाह मनोरंजन जगतामधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. २००५ मध्ये अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चनचा वक़्त: द रेस अगेंस्ट टाइम हा चित्रपट आला होता. या चित्रपटामध्ये शेफाली शाहने अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारली होती. तर अक्षय शेफाली पेक्षा वयाने ५ वर्षाने मोठा आहे.
अनुष्का शेट्टी: साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टार अनुष्का शेट्टीने बाहुबली चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली होती. चित्रपटामध्ये तिने प्रभासच्या आईची भूमिका साकारली होती. तर खऱ्या आयुष्यामध्ये प्रभासपेक्षा ती दोन वर्षाने मोठी आहे. तसे बाहुबलीच्या अगोदर आलेल्या चित्रपटामध्ये अनुष्का आणि प्रभासने कपलची भूमिका देखील साकारली आहे.

Leave a Comment