दोन वेण्या घातलेली हि मुलगी आज आहे बॉलीवूडमधील मोठे नाव, अक्षय-अमिताभसोबत केलंय काम, जाणून चकित व्हाल…

By Viraltm Team

Published on:

सध्या सोशल मिडियावर बॉलीवूड कलाकारांच्या लहानपणीचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. यादरम्यान आता पुन्हा एकदा बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीच्या लहानपणीचा फोटो सोशल मिडियावर समोर आला आहे. हा फोटो समोर येताच सोशल मिडियावर नेहमी प्रमाणे अभिनेत्रीला ओळखण्याची स्पर्धा सुरु झाली आहे.

फोटोमध्ये तीन मुली स्कूल यूनिफॉर्ममध्ये पाहायला मिळत आहेत. मधोमध फर्स्ट पोजीशनच्या स्टँडवर उभी असलेली ही मुलगी आज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. फोटोमध्ये दिसणाऱ्या या मुलीने अक्षय कुमार पासून ते अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन सारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.

२०२१ मध्ये या अभिनेत्रीने आपले स्वतःचे प्रोडक्शन हाउस देखील लॉन्च केले आहे. जर तुम्ही अजूनदेखील ओळखला नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो हि अभिनेत्री कोण आहे. या अभिनेत्रीचे नाव तापसी पन्नू आहे. तापसी पन्नूचा लहानपणीचा फोटो समोर आल्यानंतर सोशल मिडियावर चाहते तिच्या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

फोटोमध्ये रश्मि रॉकेट अभिनेत्री स्कूल यूनिफॉर्म घातलेली आणि दोन वेण्या घातलेली पाहायला मिळत आहे. या लहानग्या मुलीच्या क्युट स्माईलने सोशल मिडिया युजर्सचे मन जिंकले आहे. या फोटोवर चाहते प्रमाचा वर्षाव करत आहेत. फोटोमध्ये क्युट दिसणारी हि मुलगी गेल्या काही दिवसांपासून पापाराझींसोबतच्या भांडणामुळे चर्चेत आली आहे. हे पहिल्यांदाच नाही कि जेव्हा तापसी पन्नूचे पापाराझींसोबत भांडण झाले आहे. अभिनेत्री अनेकवेळा मिडियाला पाहून भडकत असते.

तापसी पन्नूने पिंक, मनमर्जियां, नाम शबाना, हसीन दिलरूबा, दोबारा, बदला, जुड़वा-२ आणि थप्पड सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या महिन्यामध्ये या अभिनेत्रीचा साइकोलॉजिकल थ्रिलर ब्लर चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाला दर्शकांची चांगली पसंती मिळाली.

Leave a Comment