‘एमएस धोनी’ च्या ऑनस्क्रीन बहिणीची झाली एंगेजमेंट, पहा अभिनेत्रीचे सुंदर फोटोज…

By Viraltm Team

Updated on:

स्विनी खाराने २००७ मध्ये अमिताभ बच्चन आणि तब्बू स्टारर ‘चीनी कम’ चित्रपटामधून बालकलाकार म्हणून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटातून स्विनी खराला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर २०१६ मध्ये अभिनेत्री ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटामध्ये दिसली होती.
स्विनी खारा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. अभिनेत्रीने तिच्या एंगेजमेंटचे अनेक फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये स्विनी एखाद्या परीपेक्षा कमी सुंदर दिसत नाहीये.
स्विनी खाराने तिचा लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड उर्विश देसाईसोबत एंगेजमेंट केली आहे. फोटोंमध्ये हे कपल खूपच क्यूट दिसत आहे. आता हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.
अभिनेत्रीचे एंगेजमेंट फंक्शन खूपच ग्रँड होते. डार्क पिंक कलरचा गाऊन परिधान करून स्विनी खारा खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने गुडघ्यावर बसून फिल्मी स्टाईलमध्ये तिला अंगठी घातली.
स्विनीचा होणारा नवरा उर्विश काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये खूपच हँडसम दिसत होता. इंडियन आउटफिटमध्ये तो खूपच सुंदर दिसत होता. दोघे एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून रोमान्स करतानाही दिसले.
स्विनी आणि उर्विश त्यांच्या एंगेजमेंटमध्ये खूपच खुश पाहायला मिळत आहेत. दोघांनी एकमेकांचा हात धरून रोमँटिक डान्स देखील केला.
फोटो शेअर करत अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर लिहिले की, “मी कागदाची अंगठी बनवून देखील तुझ्यासोबत लग्न करू शकते.” अनेक सेलिब्रिटींनी या फोटोंवर कमेंट करून या कपलला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘बालिका वधू’ फेम अविका गोरनेही स्विनी खाराला शुभेच्छा देताना अभिनेत्रीच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. अल्पावधीमध्येच या फोटोंना भरपूर व्ह्यूज आणि लाईक्स आले आहेत.

Leave a Comment