साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री सिल्क स्मिताने १७ वर्षाच्या फिल्मी करियरमध्ये ४५० पेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम करून खळबळ माजवली होती. १७ वर्षाच्या फिल्मी करियरमध्ये तिने असे स्थान मिळवले होते जे आजपर्यंत कोणत्याही अभिनेत्रीला मिळवता आलेले नाही. सिल्कर आणि सिल्क स्मिता नावाने प्रसिद्धी अभिनेत्रीचे खरे नाव विजयालक्ष्मी वदलापति होते.
सिल्कने एका छोट्या अभिनेत्रीच्या घरी मोलकरीण म्हणून काम करायला सुरुवात केली होती आणि नंतर ती मेकअप असिस्टेंट बनली. एक दिवस जेव्हा एक प्रोड्युसर आपल्या झगमगीत कारमध्ये त्या अभिनेत्रीच्या घरी आला तेव्हा त्याची नजर सिल्कवर पडली. हे पाहिल्यानंतर त्या अभिनेत्रीने म्हंटले कि ती तुमच्यासोबत या कारमध्ये फिरण्याचे स्वप्न पाहत आहे. सिल्कने त्याचवेळी उत्तर दिले कि एक दिवस जरूर अशाच कारमध्ये त्यांच्या घरी येऊन त्यांना नमस्कार करेल.
साउथ चित्रपटांमध्ये १९७० च्या दशकाच्या शेवटापासून ते १९९० सुरु होईपर्यंत सिल्क स्मिताची जादू दर्शकांच्या डोक्यावर चांगली चढली होती. अनेक चित्रपट जे नामी हिरो असून देखील चालत नव्हते ते फक्त सिल्क स्मिताच्या एका गाण्यामुळे सुपरहिट व्हायचे. बॉक्स ऑफिसवर प्रचंड गर्दी खेचून आणायचे सिल्क स्मिता एक साधन बनली होती.
तिला नेहमी ग्लॅमरस भूमिका दिल्या जात होत्या ज्यामुळे अभिनेत्रीची इमेज हॉट अभिनेत्री म्हणून बनली होती. ती या इमेजमधून बाहेर निघू इच्छित होती, पण इच्छा असून देखील तिला असे करता येत नव्हते. अनेक लोकानी तिला सॉफ्ट पॉ र्न देखील म्हंटले पण यामुळे तिला काहीच फरक पडला नाही.
विद्या बालनचा डर्टी पिक्चर चित्रपट २०११ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचे बजट फक्त २५ करोड रुपये होते पण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८३ करोड रुपयांची कमाई केली होती. तर या चित्रपटाने जगभरामध्ये ११७ करोड रुपयांचा गल्ला जमवला होता. हा चित्रपट सिल्क स्मिताचा बायोपिक होता ज्यामध्ये विद्या बालनने तिची भूमिका केली होती. चित्रपटामधील ऊलाला ऊलाला गाणे खूपच सुपरहिट झाले होते.